शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पहिलेच अपत्य, पण मुलगा की मुलगी अजूनही कळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 12:53 IST

Complications in New born child : आई-वडिलांसह घाटीतील डाॅक्टरांना तपासणी अहवालाची प्रतीक्षा 

ठळक मुद्दे घाटीत प्रसूती झाली मात्र अपत्यात जन्मजात गुंतागुंत  जेनेटिक तपासणीसाठी सामाजिक संस्थेची आर्थिक मदत

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : लग्नानंतर दोन वर्षांनी बाळाच्या येण्याची चाहूल लागली. पाहता पाहता गरोदरपणाची ९ महिनेही पूर्ण झाले. घाटी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली आणि नवजात शिशूच्या आगमनाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना झाला. हा आनंद काही वेळेतच चिंतेत बदलला. कारण शिशूमधील जन्मजात गुंतागुंतीच्या स्थितीने मुलगा की मुलगी, हे डाॅक्टरांनाही सांगणे अशक्य झाले. अखेर जेनेटिक तपासणीच्या अहवालानंतरच मुलगा की मुलगी, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आई-वडिलांसह घाटीतील डाॅक्टरांचे जेनेटिक तपासणीच्या अहवालाकडे डोळे लागले आहेत. ( The first child, but the boy or girl still did not know!) 

शहरात राहणारे हे दाम्पत्य कंपनीत काम करून उदरनिर्वाह करते. शिशूच्या जेनेटिक तपासणीसाठी आवश्यक ५ हजार रुपयांची रक्कमही त्यांच्याकडे नव्हती. तपासणीविनाच ते बाळाला घेऊन घाटीतून रवाना होत होते. ही बाब घाटीतील डाॅक्टर, परिचारिकांना कळली. त्यांनी सामाजिक संस्थेला ही बाब कळविली. के. के. ग्रुपचे अध्यक्ष अखिल अहमद, उपाध्यक्ष किशोर वाघमारे, सचिव शेख जुनेद, मोहम्मद आसिफ, आसिफ खान यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर शहरातील एका लॅबच्या माध्यमातून कॅरिओटायपिंग टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल मुंबई येथून दोन ते तीन दिवसांत प्राप्त होणार आहे.

जुना वाद उफाळून आला; रिक्षा चालकाचा तिघांनी खून केला

आर्थिक मदतीची गरजनवजात शिशूला आणि मातेला घाटीतील प्रसूती विभागातून सुटी देण्यात आली आहे. प्रसूती विभागातून जाताना मुलगा झाला...मुलगी झाली...असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. परंतु या दाम्पत्याला त्यासाठी वाट पाहावी लागत आहे. शिशूचे वडील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, मुलगा असो की मुलगी, असा विचार करण्याऐवजी त्याची अधिक काळजी घेत आहोत. पण मुलगा, मुलगी निदान झाल्यानंतर पुढील उपचारासाठी आर्थिक प्रश्न उभा राहू शकतो, असे म्हणाले.

अशा शिशूंचे प्रमाण कमीप्रसूतीनंतर मुलगा की मुलगी कळत नव्हते. त्यामुळे कॅरिओटायपिंग टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल लवकरच येईल. दाम्पत्याला फाॅलोअपसाठी बोलावले आहे. गर्भात बाळ तयार होताना असे प्रकार काही प्रमाणात होत असतात.- डाॅ. सोनाली देशपांडे, प्रसूतीशास्त्र विभाग, घाटी

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय