प्रथमोपचार केंद्रे नावालाच !

By Admin | Updated: October 15, 2016 01:01 IST2016-10-15T00:57:56+5:302016-10-15T01:01:08+5:30

उस्मानाबाद : महामार्गावर ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत़ मात्र, ही आरोग्य केंद्रेही केवळ नावालाच असल्याचे दिसून आले़

First Aid Calls | प्रथमोपचार केंद्रे नावालाच !

प्रथमोपचार केंद्रे नावालाच !

उस्मानाबाद : नवरात्रोत्सव ते अश्विनी पौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने महामार्गावर ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत़ मात्र, ही आरोग्य केंद्रेही केवळ नावालाच असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले़ कुठे औषधांचा तुटवडा तर कुठे कंत्राटी कर्मचारीच भाविकांना औषध गोळ्या देताना दिसून आले़
 तामलवाडी
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले आरोग्य केंद्रे हे अपुऱ्या जागेत उभारण्यात आले आहेत़ औषधांच्या तुटवड्यासह इतर मूलभूत सुविधांचा सामना करीत आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती भाविकांना मलमपट्टी करणे, औषधे देण्याचे काम करीत आहेत़
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, माळुंब्रा, सिंदफळ, बोरी येथे प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे़ आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्या नेमणुका केल्या. शुक्रवारी बोरी प्रथमोपचार केंद्रास भेट दिली असता, एका झाडाखाली टेबल मांडून आरोग्य सेविका ज्योती कांबळे काम करताना दिसून आल्या़ झाडाला फलक लावून हे केंद्र सुरू करण्यात आले होते़ येथे जुलाबाच्या गोळ्या नव्हत्या. सिंदफळ केंद्रात आरोग्य सेविका एम.जी. मुळे, आशा कार्यकर्ती ए.के. घागरे, एन.एन. धनके या उपस्थित होत्या. येथे औषधांचा साठा उपलब्ध होता. तर माळुंब्रा शिवारात तालुका आरोग्य अधिकारी डी.एल. तेलंग यांचे पथक रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. माळुंब्रा येथे आरोग्य सेवक हे हॉटेल, ढाब्यावर पाणी नमुने घेण्यासाठी गेले होते. तर आशा कार्यकर्ती सविता देवकर या उपकेंद्राचा भार सांभाळत होत्या. या प्रथमोपचार केंद्रावर पॅरासिटामल या गोळ्याचा तुटवडा होता. पत्र्याच्या शेडखाली हे केंद्र चालविले जाते. वाढत्या गर्दीचा ताण प्रथमोपचार केंद्रावर पडल्याचे दिसून आले़
ग्रामपंचायतीकडून निवाऱ्याची सोय
तामलवाडी येथे प्रथमोपचार केंद्रासाठी ग्रामपंचायतीने निवाऱ्याची सोय केली. तेथे आशा कार्यकर्ती सपना शिंदे, सविता रणसुरे, चंद्रकला रणसुरे या भाविकांना औषध, गोळ्या देण्याचे काम करीत होत्या. आरोग्य सेविका संगीता चव्हाण या भोजनासाठी आरोग्य केंद्रात गेल्या होत्या. याठिकाणी सायंकाळपर्यंत पुरेल एवढा औषधसाठा शिल्लक होता. आशा कार्यकर्तींच्या मदतीचा फायदा प्रथमोपचार केंद्राला होऊन त्यावरच आरोग्य सेवा देण्याचे काम सुरु आहे.

Web Title: First Aid Calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.