शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार बीड जिल्ह्यात, अफवांचा स्फोट छत्रपती संभाजीनगरात; घाटी रुग्णालयात पोलिसांची धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:40 IST

अफवांमुळे घाटी रुग्णालयात पोलिसांचा तातडीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडलेल्या गोळीबारातील गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी शनिवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या दाखल होताच नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमल्याने परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याच दरम्यान “घाटी रुग्णालयातच गोळीबार झाला” अशी चर्चा शहरभर वाऱ्यासारखी पसरली.

बेगमपुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी महिलेला पाच पोलिसांचा खास सुरक्षा ताफा देण्यात आला, तर रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, घाटी रुग्णालयातून पोलिस नियंत्रण कक्षाला “गोळीबार” झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने शहर पोलिसांची पथके तातडीने विविध भागात रवाना झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा केला. काही वेळाने संबंधित फोनवर संपर्क साधून चौकशी केल्यानंतर हा गोळीबार छत्रपती संभाजीनगर शहरात नव्हे, तर बीड जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस दलाने सुटकेचा श्वास सोडला. जखमी महिलेची प्रकृती नाजूक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेबाबत सविस्तर चौकशी सुरू केली असून, तिच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गोळी कोणी मारली सांगता येत नाहीमी, माझे पती आणि माझी सवत आमच्यात घरगुती भांडण झाले ते मिटविताना माझ्या सवतीच्या भावाने तसेच बहिणीने मारहाण केली. त्यावेळी माझा पतीदेखील हजर होता. परंतु, मला गोळी कोणी मारली हे नक्की सांगता येत नाही, असे गंभीर जखमी महिलेने सांगितले. सदर घटना ही कुठे घडली याबाबत काही एक सांगत नाही. सदर महिलेच्या पतीने दोन लग्न केलेले असून, दोन्ही पत्नींमध्ये कौटुंबिक वाद असून गोळीबार घटनेवर जखमी महिला स्पष्ट माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBeedबीड