शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी फटाका मार्केट शहराबाहेरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:48 IST

नागरिकांच्या सुरक्षेसाठी फटाका मार्केटला  शहराबाहेरच परवानगी देण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले.

ठळक मुद्दे नागरिकांनी विनाआवाजाचे फटाके वाजवावेतडीजेबंदीसाठी गणेश महासंघाने पुढाकार घ्यावा

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी शहरातील फटाका मार्के ट आगीत भस्मसात झाले होते, त्यामुळे गतवर्षी फटाका मार्केटला शहरात परवानगी देण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे यावर्षीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी फटाका मार्केटला  शहराबाहेरच परवानगी देण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले.

चार दिवसांपूर्वी शहरातील फटाका मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. याविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आपण पूर्णपणे फटाक्याच्या विरोधात आहोत. फटाक्याच्या रूपाने पैसे जाळण्याचाच प्रकार आहे. फटाक्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. रूढीपरंपरेप्रमाणे आपण दिवाळीत फटाके फोडतो. आता केवळ शोभेचे आणि विना आवाजाचे फटाके फोडायला हवेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या फटाका मार्केटच्या आगीच्या घटनेमुळे नागरी वसाहतीत आता फटाक्यांच्या दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. टी.व्ही. सेंटर येथील जागा फटाका दुकानांसाठी सुरक्षित आहे का, याबाबतची तपासणी केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

डीजेने काय साध्य होतेपोलीस आयुक्त म्हणाले की, गणेशोत्सवात डीजे वाजविण्यास परवानगी दिल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, यामुळे गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही. डीजेचा आवाज एवढा मोठा असतो की, कर्तव्यावरील पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही दिलेले आदेश ऐकायला येत नाहीत. एवढेच नव्हे, तर मोबाईल आणि वायरलेसवरील संदेशही समोरच्या अधिकाऱ्यांना ऐकायला येत नाही. डीजेमुळे सुरक्षा व्यवस्था कोलमडून जाते. आता गणेश महासंघांनीही पुढाकार घेऊन डीजेचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यास सांगायला हवे.

बुढीलेनमध्ये तलवारी काढणाऱ्यांना लवकरच अटकतीन दिवसांपूर्वी बुढीलेनमध्ये रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणानंतर तलवारी, लाठ्या-काठ्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने त्यादिवशी परिस्थिती नियंत्रणात आली. तलवारी काढणाऱ्या आरोपींची नावे आम्ही निष्पन्न केली असून, लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही अत्यंत गंभीरपणे कोम्बिंग आॅपरेशन राबवत आहोत. 

गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न चोऱ्या, घरफोड्या उघडकीस आणण्यात आम्हाला म्हणावे तसे यश आले नाही; मात्र गुन्हे उघडकीस आणून शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.  

टॅग्स :fire crackerफटाकेAurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद