एसबीआय बँकेच्या एटीएमला आग, १५ लाख रुपये जळून खाक
By Admin | Updated: October 22, 2015 20:52 IST2015-10-21T17:37:26+5:302015-10-22T20:52:54+5:30
औरंगाबादमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएमला लागलेल्या आगीमध्ये १५ रुपये लाख जळून खाक झाले आहेत. गारखेडा येथे सूतगिरणी चौक परिसरातील ही घटना घडली

एसबीआय बँकेच्या एटीएमला आग, १५ लाख रुपये जळून खाक
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि.२१ - औरंगाबादमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएमला लागलेल्या आगीमध्ये १५ लाख रुपये जळून खाक झाले आहेत. गारखेडा येथे सूतगिरणी चौक परिसरातील ही घटना घडली, एटीएमला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीमध्ये बऱ्याच नोटा अर्धवट जळाल्या असल्याचे समजले.
आज (बुधवार) साकळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये मशीनमधील १५ लाख रुपयांची रोकडे जळून खाक झाली आहे. घटनेच्यावेळी एटीएम ऑफलाइन होते. परिसरातील नागरिकांनी या बाबत तत्काळ अग्नीशमक विभाग आणि बँक अधिकाऱ्यांना माहिती दिली. अग्नीशमक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर येत आगीवर नियंत्रण मिळवले.