महापौर बंगल्यावर आग
By Admin | Updated: June 24, 2017 23:54 IST2017-06-24T23:52:28+5:302017-06-24T23:54:33+5:30
औरंगाबाद : महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रायगड’ बंगल्यात शनिवारी शॉर्ट सर्किटमुळे किरकोळ आग लागली होती.

महापौर बंगल्यावर आग
औरंगाबाद : महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रायगड’ बंगल्यात शनिवारी शॉर्ट सर्किटमुळे किरकोळ आग लागली होती. येथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे जास्तीचे नुकसान झाले नाही. दुपारी चार वाजेच्या सुमारास महापौर बंगल्यावर वीजपुरवठ्याच्या बॉक्समध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. वीजपुरवठ्याचे केबल जुने झालेले असल्याने दोन विजेच्या तारा एकमेकांना जोडल्या गेल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचे सांगण्यात आले. शार्ट सर्किट होताच येथील सुरक्षारक्षकांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन विभागाचे प्रभारी प्रमुख आर. के. सुरे अग्निशमन व्हॅन व कर्मचाऱ्यांसह येथे दाखल झाले. त्यांनी पाहणी करून वीजपुरवठा पूर्ववत केला.