घरात लागली आग
By Admin | Updated: October 31, 2016 00:58 IST2016-10-31T00:55:56+5:302016-10-31T00:58:52+5:30
परभणी : शांतीनिकेतन कॉलनीतील एका घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना ३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७़१५ वाजण्याच्या सुमारास घडली़

घरात लागली आग
परभणी : शांतीनिकेतन कॉलनीतील एका घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना ३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७़१५ वाजण्याच्या सुमारास घडली़
शांती निकेतन कॉलनीतील गोविंद सदाशिवराव मुंडे यांच्या घरात देवासमोर लावलेल्या लाईटींगचे वायर गरम झाल्याने ते पघळले आणि त्याची एक थिनगी गादीवर पडल्याने पेट घेतला़ आग वाढल्याने एकच घबराट निर्माण झाली़ तत्काळ अग्नीशामक दलाला माहिती दिल्यानंतर अग्नीशमन अधिकारी आऱ जी़ शिंदे, फायरमन कानडे, एस़ के मौलाना आदी अग्नीशमन बंबासह घटनास्थळी पोहचले़ काही वेळातच ही आग आटोक्यात आली़ दरम्यान, या घटनेमध्ये मुंडे यांच्या घरातील एक एलसीडी टीव्ही आणि गादी जळाली असल्याची माहिती मिळाली़ (प्रतिनिधी)