जिल्हा परिषदेतील सभागृहाला आग
By Admin | Updated: August 7, 2014 02:06 IST2014-08-07T00:57:04+5:302014-08-07T02:06:06+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या एसी स्टॅबलायझरला आग ढकलावी लागली

जिल्हा परिषदेतील सभागृहाला आग
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या एसी स्टॅबलायझरला बुधवारी (दि. ६) आग लागल्यामुळे नियोजित स्थायी समितीची मासिक बैठक पुढे ढकलावी लागली.
दुपारी एक वाजता सुरू होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी कर्मचारी तयारीला लागले असतानाच १२ वाजेच्या सुमारास सभागृहाबाहेरील एसी यंत्रणेच्या स्टॅबलायझरमध्ये शॉर्टसर्किट झाले व आग भडकली.
तेथे उपस्थित असलेले सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी श्याम भाले यांनी प्रसंगावधान राखून त्वरित वायरमनला बोलावून घेतले. तोपर्यंत आग भडकून चार स्टॅबलायझरपर्यंत पोहोचली होती. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन नळकांड्यांचा मारा केला. अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यावरून आगीचा बंबही तेथे दाखल झाला.
या आगीच्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी अभियंत्यांना सांगण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाविस्कर यांनी सांगितले.