अग्निशमनचा उपकर एमआयडीसीने घटविला

By Admin | Updated: July 24, 2014 00:26 IST2014-07-24T00:12:12+5:302014-07-24T00:26:59+5:30

नवीन नांदेड : येथील औद्योगिक क्षेत्रात ‘एमआयडीसी’ च्या वतीने लावण्यात आलेला फायरसेस अर्थात अग्निशमनचा उपकर कमी करण्यात आला आहे. उद्योजक मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेतला.

The fire cess reduced by the MIDC | अग्निशमनचा उपकर एमआयडीसीने घटविला

अग्निशमनचा उपकर एमआयडीसीने घटविला

नवीन नांदेड : येथील औद्योगिक क्षेत्रात ‘एमआयडीसी’ च्या वतीने लावण्यात आलेला फायरसेस अर्थात अग्निशमनचा उपकर कमी करण्यात आला आहे. उद्योजक मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेतला.
एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रात उभालेल्या फायर स्टेशनच्या खर्चाचा भार या भागातील उद्योजकांच्या भूखंडाला विभागून देण्यात आला. हा उपकर दोन रुपये ९५ पैसे प्रतिचौरस मीटर होता. हा दर जास्तीचा असल्याने उद्योजक मित्र- मंडळाने तो कमी करावा, यासाठी प्रयत्न सुरु केले. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गगरानी, मुख्य अग्निशमन अधिकारी एम. व्ही. देशमुख यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून उपरोल्लेखित उपकरासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. या सर्व बाबींचा विचार करून महामंडळाने १७ जुलै २०१४ रोजी एक परिपत्रक काढून नांदेड येथील ‘फायरसेस’ कमी केले. या परिपत्रकानुसार आता प्रतिचौरस मीटर १ रूपये ७० पैसे इतका दर आकारण्यात आला आहे. आनंद बिडवई, अतुल बेरळीकर, गोविंद साबु, गिरीष मोगडपल्ली, महेश रेखावार, निलेश मुंदडा, आशिष लोखंडे व राकेश शहा, अशोक कासलीवाल, कबीर जस्सानी यांनी या निर्णयाचे स्वागत केले.(वार्ताहर)
नवीन पूल - लातूर फाटापर्यंतचे दिवे बंद
नवीन नांदेड : नवीन पूल - लातूर फाटा रस्त्यावरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर मोठी रहदारी आहे. रात्रीला या रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. या भागातील नागरिकांना अंधारातच घरी परतावे लागते. अंधारामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे फावत आहे. वाटमारीच्या अनेक घटना या रस्त्यावर घडल्या आहेत. रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्याची मागणी मनसेचे सुनील पाटील, महेश राठोड, बालाजी चव्हाण, नागेश पांचाळ, सतनामसिंग, अमोल नलावडे यांनी केली.(वार्ताहर)
उद्योजक मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद बिडवई व उपाध्यक्ष अतुल बेरळीकर आणि उद्योजक ललित तापडीया यांनी स्थानिक औद्योगिक वातावरण व परिस्थितीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान, नांदेडचा ‘फायर सेस’ हा औरंगाबाद जवळील पंचतारांकित शेन्द्रा एमआयडीसी पेक्षा जास्त असल्याचे उद्योजकांच्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

Web Title: The fire cess reduced by the MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.