शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

By Admin | Updated: March 6, 2017 00:52 IST2017-03-06T00:50:36+5:302017-03-06T00:52:06+5:30

उस्मानाबाद : शहरातील आनंदनगर भागातील सांस्कृतिक सभागृहाच्या आवारात असलेल्या बीअ‍ॅण्डसी क्वॉर्टरमधील एका इमारतीला रविवारी सकाळी शॉर्टसर्किटने आग लागली़

Fire at the building due to the short circuit | शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

उस्मानाबाद : शहरातील आनंदनगर भागातील सांस्कृतिक सभागृहाच्या आवारात असलेल्या बीअ‍ॅण्डसी क्वॉर्टरमधील एका इमारतीला रविवारी सकाळी शॉर्टसर्किटने आग लागली़ या भागातील नागरिकांनी सतर्कता दाखवून आग वेळेत आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली़ मात्र, या घटनेत एका नव्याकोऱ्या दुचाकीसह तीन सायकली जळून खाक झाल्या़
विविध शासकीय कार्यालयात काम करणारे वर्ग एक ते वर्ग चार चे अधिकारी, कर्मचारी शहरातील आनंदनगर भागातील बीअ‍ॅण्डसीच्या क्वॉर्टरमध्ये राहतात़ इथे जवळपास १२ इमारती असून, प्रत्येक इमारतीत १० ते १२ जणांचे कुटूंब वास्तव्याला आहे़ या भागातील प्रकार १ नियमित २४ ते ३६ क्रमांकाच्या इमारतीला रविवारी सकाळी शॉर्टसर्किटने आग लागली़ अचानक आग लागल्याने या इमारतीतील रहिवाशांची एकच धावपळ उडाली़ मात्र, ऐन बाहेर पडण्याच्या मुख्य मार्गावरील विद्युत बोर्ड व त्याजवळील दुचाकी, सायकलींनी पेट घेतल्याने इमारतीच्या बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले़ त्यामुळे अनेकांनी थेट इमारतीच्या वर धाव घेतली़ पाहता-पाहता आगीचा भडका उडाला़ इमारतीला आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली़ त्यानंतर या भागातील रहिवाशांनी मिळेल तेथील पाणी आणून इमारतीवर मारण्यास सुरूवात केली़ नागरिकांनी अटोकाट प्रयत्न करून आग अटोक्यात आणली़ नागरिकांनी आग अटोक्यात आणल्यानंतर इमारतीवर असलेल्या बालक, महिलांसह नागरिकांचा जीव भांड्यात पडला़ आग अटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली़ त्यानंतर पुन्हा एकदा सर्व इमारतीवर पाणी फवारण्यात आले़ ही आग अटोक्यात आणण्यासाठी नगरसेवक अक्षय ढोबळे यांच्यासह या भागातील नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले़ यावेळी आनंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर शिंदे, पोउपनि संतोष माने व इतर कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Fire at the building due to the short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.