नागमठाण येथे आग लागून गरिबाची झोपडी खाक

By | Updated: December 5, 2020 04:06 IST2020-12-05T04:06:58+5:302020-12-05T04:06:58+5:30

नागमठाण येथे गायकवाड बंधू साध्या झोपडी रुपी घरात राहत होते. शुक्रवारी अचानक आग लागून संपूर्ण झोपडी भस्मसात झाली. यात ...

A fire broke out at Nagmathan and destroyed the hut of the poor | नागमठाण येथे आग लागून गरिबाची झोपडी खाक

नागमठाण येथे आग लागून गरिबाची झोपडी खाक

नागमठाण येथे गायकवाड बंधू साध्या झोपडी रुपी घरात राहत होते. शुक्रवारी अचानक आग लागून संपूर्ण झोपडी भस्मसात झाली. यात त्यांचे सर्व संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. यामुळे गायकवाड कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी तातडीने भेट देऊन गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन करुन आर्थिक मदत दिली. तलाठी महेंद्र गायकवाड यांनी तातडीने जळीत घटनेचा पंचनामा केला असून वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविला आहे. ग्रामसेवक पुरी यांनी विशेष बाब म्हणून शबरी घरकूल योजनेत नावे समाविष्ट करुन तातडीने प्रस्ताव दाखल करावे, असे निर्देश गलांडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

फोटो कॅप्शन : नागमठाण येथील गायकवाड कुटुंबियांचे जळून खाक झालेल्या घराची पाहणी करताना, जि.प. सभापती अविनाश गलांडे पाटील व तलाठी.

Web Title: A fire broke out at Nagmathan and destroyed the hut of the poor