जिल्ह्यात ‘फायर ब्रिगेड’ पडतेय नागरिकांच्या रोषाला बळी..!
By Admin | Updated: April 8, 2015 00:54 IST2015-04-08T00:28:38+5:302015-04-08T00:54:09+5:30
बीड : आग लागली की, ताबडतोब अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते, मात्र जिल्ह्यातील अग्नीशमन दलाची यंत्रणा अतिशय तोकडी असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांच्या रोषाला

जिल्ह्यात ‘फायर ब्रिगेड’ पडतेय नागरिकांच्या रोषाला बळी..!
बीड : आग लागली की, ताबडतोब अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते, मात्र जिल्ह्यातील अग्नीशमन दलाची यंत्रणा अतिशय तोकडी असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावेल लागत असल्याचे वास्तव आहे. आजही जिल्ह्यात ‘फायरमॅन’ सह चालक व अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अग्नीशम यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. जागतीक अग्निशन दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा.
ग्रहमंत्रालय भारत सरकार अंतर्गत स्थायी अग्नीशमन मार्गदर्शक कमिटीच्या निर्देषानुसार अग्नीशमन दल चालते. ५० हजार लोकवस्तीला एक अग्नीशमन गाडी असावी, असे शासनाचे निर्देश आहेत, मात्र बीड शहराची संख्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास आहे. यासाठी किमान सहा गाड्यांची आवश्यकता आहे. परंतू आज शहरासाठी केवळ तीनच गाड्या असून यासाठी केवळ दोन फायर मॅन आणि एक जमादार आहे. शासन निर्देशानुसार प्रत्येक गाडीवर एका पाळीला पाच फायरमॅन आणि ३ चालक असावे असा नियम आहे. शहरातील उपलब्ध गाड्यांच्या संख्येनुसार ४५ फायरमॅन आणि २७ चालकांची आवश्यकता आहे. परंतू आजही या ७२ लोकांचा कारभार केवळ तीन लोकांवर चालत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही स्थिती केवळ बीड शहराची नसून संपूर्ण बीड जिल्ह्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.