मळीच्या टाकीला आग; अडीच कोटींची हानी
By Admin | Updated: May 21, 2015 00:30 IST2015-05-21T00:09:51+5:302015-05-21T00:30:48+5:30
माजलगाव: तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगर्स वरील मळीच्या टाकीला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत अडीर कोटी रुपयांची मळी जळाली.

मळीच्या टाकीला आग; अडीच कोटींची हानी
माजलगाव: तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगर्स वरील मळीच्या टाकीला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत अडीर कोटी रुपयांची मळी जळाली.
मळी ही ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी गेवराई, माजलगाव, तेलगाव कारखाना, परळी येथील अग्नीशामक दलांची व खाजगी टँकरची मदत घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत आग आटोक्यात येऊ शकली नाही. या आगीत सहा हजार मेट्रीक टन मळी जळून खाक झाली. याची किंमत अंदाजे दोन कोटी चाळीस लाख रुपये असल्याचे व्यवस्थापक अशोक पवार यांनी सांगितले. कारखान्यातील मळी ही डिस्टलरी प्रकल्पासाठी विक्री करण्यात येते. (वार्ताहर)