भोकरच्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला आग
By Admin | Updated: June 23, 2014 00:03 IST2014-06-22T23:50:12+5:302014-06-23T00:03:37+5:30
भोकर : येथील स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग नागरिकांच्या सहकार्यामुळे त्वरित विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला़
भोकरच्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला आग
भोकर : येथील स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग नागरिकांच्या सहकार्यामुळे त्वरित विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला़ या आगीत केबल, टाकाऊ फर्निचर जळून खाक झाले़ या व्यतिरिक्त बँकेचे कोणतेच नुकसान झाले नसल्याची माहिती शाखाधिकारी डी़ एस़ जोशी यांनी दिली़
भोकर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला २२ जूनच्या दुपारी २़४५ वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लाली़ या आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच पत्रकार रामचंद्र मुसळे, उत्तम बाबळे, माधव गादेवाड, मिर्झा फईम बेग, काशीनाथ लिंगकर, प्रसाद साईनवार, असलम सेठ, कल्याणकर यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही आग लवकर विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने ही आग त्वरित विझली़
या दरम्यान भोकरची अग्निशमन दलाचा पंपही बोलावण्यात आला़ सदरील आगीत केवळ टाकाऊ फर्निचर जळून खाक झाले़ कागदपत्रासह कसलेच नुकसान या आगीत झाले नाही़ (वार्ताहर)
आगीने रौद्र रूप धारण केले असते तर मोठा अनर्थ झाला असता़ पण नागरिकांच्या सहकार्यामुळे ही आग लवकर विझली़ यात सहकार्य केलेल्या सर्व नागरिकांचा मी आभारी आहे - डी़एस़जोशी, शाखाधिकारी