अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात तिघांविरुद्धचा एफआयआर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:43+5:302020-12-17T04:26:43+5:30
गौरीचे वर्गमित्र असलेले साईश कणाला, संकेत अडलक आणि पीयूष डावकर यांनी प्रथम माहिती अहवाल रद्द व्हावा, यासाठी खंडपीठात धाव ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात तिघांविरुद्धचा एफआयआर रद्द
गौरीचे वर्गमित्र असलेले साईश कणाला, संकेत अडलक आणि पीयूष डावकर यांनी प्रथम माहिती अहवाल रद्द व्हावा, यासाठी खंडपीठात धाव घेतली होती.
२४ मे २०१९ रोजी सकाळी ६:३० वाजता गौरीने तिच्या राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास घेतला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
गौरीने इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी तिच्या वडिलांना २७ मे रोजी सापडली होती. त्यात तिने तिचा वर्गमित्र साईश याने मैत्री करून, मैत्री संबंधातील काही छायाचित्रे तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून त्याचे मित्र संकेत आणि पीयूष यांच्या मदतीने हॅक करून चोरून घेतले आणि ते महाविद्यालयातील मित्रांना व इतरांना पाठवून (शेअर ) गौरीची बदनामी केली. तसेच दुसऱ्या मुलीसोबत मैत्री करून गौरीला मार्च २०१८ पासून २४ मे २०१९ पर्यंत मानसिक त्रास दिला. असा मजकूर गौरीने मरणापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवला होता.
गौरीचे वडील सुशील खवेसे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम ३०६ सह ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
साईशतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, संकेततर्फे ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे आणि पीयूषतर्फे ॲड. संदीप राजेभोसले यांनी बाजू मांडली. ॲड. देशमुख यांना ॲड. गोविंद कुलकर्णी, ॲड. ठोंबरे यांना ॲड. मुरलीधर कराड आणि ॲड. राजे भोसले यांना ॲड.सुधीर धोंगडे आणि ॲड. गायत्री राजे भोसले यांनी सहकार्य केले.
.