तीन महिन्यानंतर नोंदवला बलात्काराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 18:04 IST2017-08-04T18:04:18+5:302017-08-04T18:04:42+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपिने कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्याने तक्रार दाखल करण्यास मुलगी पुढे आली नव्हती.

तीन महिन्यानंतर नोंदवला बलात्काराचा गुन्हा
ऑनलाईन लोकमत
पाटोदा ( जि. बीड ), दि.४ : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपिने कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्याने तक्रार दाखल करण्यास मुलगी पुढे आली नव्हती.
बोडखेवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेतात कामावर आली असता प्रमोद खरतुडे (२८) याने १६ मे रोजी तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारीत मुलगी बारावी मधे शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती गरीब असल्याने ती शेतात कामावर जाते.
पिडीतेचे लग्न मोडले
काही दिवसापूर्वी पिडीत तरूणीसाठी विवाह स्थळ आले होते. विवाह जमवण्यास आलेल्या पाहूण्यांना प्रमोद याने धमकी देऊन हा विवाह करू नका असे सांगितले. या प्रकारानंतर मुलीने तिच्या घरच्यांना तीन महिन्यापूर्वी घडलेला प्रकार सांगीतला. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर गुरुवारी (दि. ३) रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी फरार असून सपोनी संजय सहाने तपास पुढील करत आहेत.