शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी शिक्षक आणि फार्मासिस्ट; प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 20:49 IST

८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ दरम्यान ही फसवणूक झाली.

औरंगाबाद : औषधी दुकानात पूर्णवेळ फार्मासिस्ट असल्याचे शासनास दाखवून एका महाविद्यालयात नोकरी करणाऱ्या प्राचार्याविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ दरम्यान ही फसवणूक झाली.

झहीद जहीर अहेमद जहीर असे गुन्हा नोंद झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. याविषयी क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, झहीद वाय.बी.चव्हाण. औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. असेफिया कॉलनी येथील मे. ताबिश मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर येथे ८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ या कालावधीत औषधनिर्माता म्हणून पूर्णवेळ कार्यरत असल्याची कागदपत्रे त्यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सादर केली होती. औषध निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत झहीद मे. ताबिश मेडिकल स्टोअरमध्ये न आढळल्याने २०१३ साली दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून हे दुकान बंद आहे.

मात्र, वाय.बी. चव्हाण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून कार्यरत प्रा. झहीद  ८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ या कालावधीत मे. ताबिश मेडिकल स्टोअरमध्ये पूर्णवेळ औषधनिर्माता म्हणून काम करीत असल्याचे दाखवीत असत, अशी तक्रार अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि मंत्रालयात एका जणाने केली होती. प्रशासनाने या तक्रारीची चौकशी केली.  चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने औषधी निरीक्षक राजगोपाल मूलचंद बजाज यांनी ७ जानेवारी रोजी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात प्राचार्य झहीद यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पुणे तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद