आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-13T23:27:12+5:302014-07-14T01:01:59+5:30
जालना : भरधाव वेगाने व हलगर्जीपणामुळे दुचाकी वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात चंद्रकला गोविंद भोसले (५५) ही महिला दुचाकीवरून कोसळून मरण पावली.

आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल
जालना : भरधाव वेगाने व हलगर्जीपणामुळे दुचाकी वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात चंद्रकला गोविंद भोसले (५५) ही महिला दुचाकीवरून कोसळून मरण पावली.
जमादार आनंद भागुजी काकडे यांनी सदर प्रकरणात तक्रार दाखल केली.
मयत महिलेचा मुलगा अजय गोविंद भोसले हा दुचाकी वाहन चालवित होता.
त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी सदर प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. २७ एप्रिल २०१४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अजय भोसले आईला घेऊन जालन्याकडे येत असताना गवळी पोखरी पाटीजवळ अपघात होऊन त्याची आई दुचाकीवरून खाली कोसळून मरण पावली होती.
सदर प्रकरणात अजय भोसले विरोधात आईच्या मरणास कारणीभूत ठरल्याने तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जमादार कमलाकर अंभोरे पाटील यांनी दिली.
(प्रतिनिधी)
मुलाला विहिरीत टाकून महिलेची आत्महत्या
माहेरी रस खाण्यास पतीने प्रतिबंध केला. त्यामुळे रागावलेल्या ज्योती आजिनाथ दाभाडे हिने दीड वर्षाच्या मुलाचा विहिरीत टाकून खून केला. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी दीड महिन्यानंतर आजिनाथ साळूबा दाभाडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुरूमखेडा (ता.औरंगाबाद) येथील प्रभात गिरीजाबा दाभाडे यांच्या विहिरीत हा प्रकार ३१ मे रोजी सकाळी १० वाजता घडला होता.