सीएस चव्हाणविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:54 IST2017-07-29T00:54:37+5:302017-07-29T00:54:37+5:30
बीड : येथील जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या खाजगी रूग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला होता. यामध्ये डॉक्टर चव्हाण यांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने दिला होता. यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.

सीएस चव्हाणविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या खाजगी रूग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला होता. यामध्ये डॉक्टर चव्हाण यांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने दिला होता. यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.
शहरातील वैशाली विजय बनसोडे या महिलेला प्रसुतीसाठी डॉ.चव्हाण यांच्या सामत या खाजगी रूग्णालयात २७ सप्टेंबर २०१६ रोजी दाखल केले होते. यावेळी तिचे सिझर करण्यात आले. वैशालीची प्रकृती गंभीर असतानाही डॉ.चव्हाण यांनी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा दाखवत बैठकीला निघून गेले. याचदरम्यान वैशाली यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वैशालीच्या नातेवाईकांनी डॉ. चव्हाण यांच्याविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली होती. त्यात डॉ. नागेश चव्हाण दोषी असल्याचे उघडकीस आले. समितीचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर झाल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे फौजदार रफियोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून डॉ. चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.