परळीत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखसह दहाजणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:46 IST2017-10-01T23:46:57+5:302017-10-01T23:46:57+5:30
परळीचे माजी नगराध्यक्ष तथा न.प.चे पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक देशमुख यांच्यासह १० जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी यातील सर्व आरोपी फरार होते.

परळीत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखसह दहाजणांविरूद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील सावतामाळी नगरातील राष्टÑीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष रोहिदास बनसोडे यांना व घरातील मंडळींना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी रात्री परळीचे माजी नगराध्यक्ष तथा न.प.चे पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक देशमुख यांच्यासह १० जणांविरुद्ध संभाजीनगर ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी यातील सर्व आरोपी फरार होते.
माझ्या पुतण्याला का मारहाण केली, असे म्हणून दीपक देशमुखसह दहाजण घरात घुसले व आपणास तसेच भावास, भावजयीस, मुलीस लाथाबुक्क्याने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार रोहिदास बनसोडे यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन ३० सप्टेंबर रोजी दहा जणांविरुद्ध मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणेचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद करीत आहेत.