चाऱ्याचा ४४ कोटींचा निधी पडून
By Admin | Updated: September 29, 2015 00:44 IST2015-09-29T00:37:08+5:302015-09-29T00:44:44+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्यासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे़ मात्र जिल्ह्यात केवळ तीनच चारा छावण्या

चाऱ्याचा ४४ कोटींचा निधी पडून
लातूर : लातूर जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्यासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे़ मात्र जिल्ह्यात केवळ तीनच चारा छावण्या सुरु असल्याने हा निधी पडून आहे़ निलंगा १, अहमदपूर १ आणि औसा तालुक्यात १ अशा एकूण ३ चारा छावण्या सुरु आहेत़ या छावण्यात केवळ १२०० पशुधनांची देखभाल केली जात आहे़ मोठ्या जनावरांसाठी ७० आणि लहान्यांसाठी ३० रुपये दर दिवसाला निधी देण्याचे नियोजन आहे़
लातूर जिल्ह्यात चारा उपलब्ध नाही़ त्यामुळे प्रशासन आणि सहकारी संस्था, साखर कारखाने तसेच सेवाभावी संस्थांना चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे दहा ते बारा प्रस्ताव दाखलही झाले़ परंतु जाचक अटींमुळे केवळ आठ प्रस्तावांना मंजुरी मिळाली़ त्यातील केवळ पाच चारा छावण्या सुरु झाल्या आणि दोन बंदही पडल्या आहेत़ प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यामुळे औसा तालुक्यातील एक व लातूर शहरातील एक अशा दोन चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात ५ लाख १५० लहान-मोठ्या जनावरांची संख्या आहे़ त्यापैकी ३ लाख ३२५ दुधाळ जनावरे आहेत़ त्यात २ लाख ३२ हजार ५८४ गायी, म्हशी आहेत़ उर्वरित शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे़ या पशुधनाला दिवसाला ३ हजार १६६ किलो चारा लागतो़ मात्र जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात चारा उपलब्ध नाही़ त्यामुळे शासनाने चाऱ्यासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ परंतु, खर्चाविना पडून आहे.(प्रतिनिधी)