नांदेडात मराठा जात प्रमाणपत्र मिळेना

By Admin | Updated: July 23, 2014 00:23 IST2014-07-23T00:09:16+5:302014-07-23T00:23:46+5:30

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले़ परंतु आॅनलाईन प्रक्रियेमुळे मराठा जात प्रमाणपत्र वितरणास विलंब होत आहे़ अद्याप नांदेड जिल्ह्यातील एकाही लाभधारकास जात प्रमाणपत्र मिळालेले नाही़

Finding Maratha Caste Certificate in Nanded | नांदेडात मराठा जात प्रमाणपत्र मिळेना

नांदेडात मराठा जात प्रमाणपत्र मिळेना

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले़ परंतु आॅनलाईन प्रक्रियेमुळे मराठा जात प्रमाणपत्र वितरणास विलंब होत आहे़ अद्याप नांदेड जिल्ह्यातील एकाही लाभधारकास जात प्रमाणपत्र मिळालेले नाही़
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र पदवी तसेच इतर अभ्यासक्रमास प्रवेश सुरू आहेत़ अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशास अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ जुलै असल्याने मराठा जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर तातडीने मिळणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे़ शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे १८ जुलैपासूनच मराठा जात प्रमाणपत्र मिळण्यास सुरूवात झाली आहे़ परंतु नांदेड जिल्ह्यात आॅनलाईन प्रक्रियेमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे़ महाआॅनलाईन पोर्टलवर मराठा जात प्रमाणपत्राचा फॉरमॅट अद्याप टाकला नसल्याने अडचणी येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़
आॅनलाईन अथवा आॅफलाईन कोणतीही प्रकिया असो विद्यार्थ्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळाले तरच २०१४ - १५ या शैक्षणिक वर्षातील काही अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मराठा आरक्षणाचा फायदा होईल़ प्रमाणपत्र तत्काळ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचितही राहू शकतात़
प्रत्यक्ष प्रमाणपत्र वितरणास सुरूवात झाल्यावर प्रशासनाने मराठा जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर देण्यास प्राधान्य द्यावे तसेच येणाऱ्या रविवारीदेखील कार्यालये, सेतू केंद्र उघडी ठेवावी, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत़ (प्रतिनिधी)
महाआॅनलाईनवर मराठा जात प्रमाणपत्राचा फॉरमॅट उपलब्ध नाही़ आज सायंकाळपर्यंत तो उपलब्ध होईल़ तसे न झाल्यास मंगळवारपासून आॅफलाईन प्रक्रिया तसेच अर्जाची पडताळणी करून प्रमाणपत्राचे काम पूर्ण करून ते गुरूवारी सकाळपासून प्रत्यक्ष वाटप केले जाईल़ कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची आम्ही काळजी घेवू़
- प्रदीप कुलकर्णी,
निवासी उपजिल्हाधिकारी , नांदेड
शासनाने गाजावाजा करीत मराठा आरक्षण जाहीर केले़ परंतु अधिकारी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदेड जिल्ह्यात जात प्रमाणपत्र काढण्यास अडचणी येत आहेत़ जिल्हा प्रशासनाने येत्या दोन दिवसांत प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत़ तसेच येणाऱ्या रविवारीदेखील जात प्रमाणपत्र वितरणाचे काम सुरू ठेवावे़
- संतोष गव्हाणे, जिल्हाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड, नांदेड

Web Title: Finding Maratha Caste Certificate in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.