प्रगतीच्या वाटा शोधा
By Admin | Updated: December 20, 2015 23:56 IST2015-12-20T23:50:05+5:302015-12-20T23:56:01+5:30
औरंगाबाद : काळ बदलला आहे. प्रगतीची वेगवेगळी दालने खुली झालेली आहेत. प्रगतीच्या वाटा शोधा आणि जीवनात क्रांती घडवून आणा, यातून समाजऋण फेडता येईल.

प्रगतीच्या वाटा शोधा
औरंगाबाद : काळ बदलला आहे. प्रगतीची वेगवेगळी दालने खुली झालेली आहेत. प्रगतीच्या वाटा शोधा आणि जीवनात क्रांती घडवून आणा, यातून समाजऋण फेडता येईल. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन निवृत्त पोलीस उपअधीक्षक विश्वासराव देशमुख यांनी व्यक्त केले.
तुळजाई मराठा देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्रेहमिलन सोहळ्यात देशमुख यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. वीरेंद्र देशमुख होते. भोकरदनचे नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख गुलाबराव देशमुख, दिलीपराव देशमुख, अशोकराव गरूड, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संचालक किशोर शितोडे, शिवाजी दांडगे, नरसिंगराव चव्हाण, देशमुख प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रकाशराव पतंगे, चंद्रशेखर देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. शारदा देशमुख, किशोर शितोडे, गुलाबराव देशमुख यांचीही भाषणे झाली. संचालन प्रतिष्ठानचे संचालक राम निंबाळकर यांनी केले.
मान्यवरांचा गौरव
यावेळी मराठा देशमुख समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात गणेश साळुंके, किशोर शितोडे, राजेश्वरराव कल्याणकर, फकीरा देशमुख, हरिदास निकम, अभिजित देशमुख,माधवराव देशमुख, अमोल देशमुख, प्रकाशराव देशमुख, श्याम पाटील, गौरव पतंगे, प्रल्हाद शिंदे, दिनेश देशमुख, योजना देशमुख, बापूसाहेब देशमुख, संजय गरूड, मीनाक्षी देशमुख, रणजित देशमुख, प्रकाश देवकर, शीतल देशमुख, अरूण शिंदे, पद्मजा देशमुख, अमरजित देशमुख, चंद्रकांत देशमुख, देवीदास देशमुख, अनिता देशमुख, राजेंद्र देशमुख, सुभाषराव देशमुख, सोनाली गाढे यांचा समावेश होता.