शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएनए’ चाचणी अहवाल मिळेना

By admin | Updated: June 17, 2014 00:40 IST

कुरूंदा : स्थानिक पोलिसांनी कुरूंद्यातील सांगडा प्रकरणातील एका बेपत्ता युवकासह महिलेच्या नातेवाईकांचे रक्तनमुने ओळख पटविण्यासाठी डीएनए

कुरूंदा : स्थानिक पोलिसांनी कुरूंद्यातील सांगडा प्रकरणातील एका बेपत्ता युवकासह महिलेच्या नातेवाईकांचे रक्तनमुने ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीकरिता मुंबईच्या कलीना प्रयोगशाळेत पाठविले होते. जवळपास दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी त्याचा अहवाल न आल्याने पोलिसांपुढील अडचणी वाढल्या आहेत.
कुरूंदा येथील जि. प. हायस्कुल जवळ एका कोरड्या टाकीत दोन मानवी सांगडे आढळले होते. त्यापैकी एक सांगडा युवकाचा तर एक युवतीचा होता. दरम्यान, कुरूंद्यातील एक युवक बेपत्ता असल्याने त्याचाच हा सांगाडा असल्याचा दाट संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता. तसेच गावातील एक महिलाही बेपत्ता आहे. या दोघांच्या नातेवाईकांचे रक्तनमुने डीएनएसाठी पोलिसांनी दोन वर्षापूर्वी पाठविले होते. ‘डीएनए’मुळे ओळख पटल्यास तपासणीला दिशा मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्ष उलटले तरी अद्याप त्या डीएनएचा अहवाल मुंबई प्रयोगशाळेतून कुरूंदा पोलिसांकडे आलेला नाही. प्रयोगशाळेतून डीएनए न आल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गरीब कुटुुंबातील व्यक्तीचे हे प्रकरण असल्यामुळे संबंधित अधिकारी हलगर्जीपणा दाखवित असल्याचा आरोप होत आहे. संबंधित प्रयोगशाळा डीएनए देण्यासाठी हलगर्जीपणा का दाखवित आहे. त्याची तक्रार थेट मंत्रालयात पोलिस प्रशासनातर्फे करणे गरजेचे होते; परंतु पोलिस प्रशासन देखील शांत असल्याचे दिसते. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास असताना हे प्रकरण निकाली न निघाल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या विशेष क्राईम रिपोर्ट कार्यक्रमात बेपत्ता युवकाच्या आईने त्याचा घातपात झाल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे हे देखील त्यात दूरध्वनीवरून सहभागी होते. एकूणच सुरूवातीपासून पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही.
वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांना विचारले असता, हे प्रकरण दोन वर्षापुर्वीचे असून काही दिवसांपुर्वीच ते माझ्याकडे आले आहे. त्याबाबत माहिती घेणे सुरू असून डीएनए रिपोर्ट आणण्यासाठी पोनि दर्जाचा अधिकारी मुंबईला ३ दिवसांपुर्वीच पाठवण्यात आला आहे. दरम्यान, कुरूंदा येथील बेपत्ता युवकाच्या आईसह साक्षीदारांचे पुन्हा जवाब नोंदवून या प्रकरणाचा फेरतपास करणार असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)
नव्याने तपासाची मागणी
दोन वर्षापूर्वी वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील जि.प. हायस्कुल जवळ असलेल्या पाण्याच्या एका कोरड्या टाकीमध्ये दोन मानवी सांगाडे आढळले होते.
एक सांगाडा युवक तर दुसरा युवतीचा होता. कुरूंद्यातील बेपत्ता युवकाचाच हा सांगाडा असल्याचा दाट संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता.
त्याच काळात युवकाप्रमाणचे गावातील एक महिलाही बेपत्ता झाली होती. या दोघांच्या नातेवाईकांचे रक्त नमुने ‘डीएनए’ चाचणीसाठी कुरूंदा पोलिसांनी दोन वर्षापुर्वी पाठविले होते.
दोन वर्ष उलटले तरी अद्याप त्या ‘डीएनए’ अहवाल मुंबई प्रयोगशाळेतून पोलिसांकडे आलेला नाही.
गरीब कुटुंबातील युवकाचे हे प्रकरण असल्यामुळे संबंधित अधिकारी हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप होत आहे.
एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या विशेष क्राईम रिपोर्ट कार्यक्रमात बेपत्ता युवकाच्या आईने त्याचा घातपात झाल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे.