अखेर नांमकातून सुटले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:56+5:302021-04-09T04:05:56+5:30
वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना ५ एप्रिलपासून उन्हाळी आवर्तन सोडले जाणार होते. मात्र, कोणीही मागणी न केल्याने आवर्तन रद्द ...

अखेर नांमकातून सुटले पाणी
वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना ५ एप्रिलपासून उन्हाळी आवर्तन सोडले जाणार होते. मात्र, कोणीही मागणी न केल्याने आवर्तन रद्द करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला होता. याची दखल घेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता नांदूर मधमेश्वर धरणातून एक्स्प्रेस कालव्यात पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी सकाळपर्यंत हे पाणी गंगापूरपर्यंत पोहोचेल. पायथा ते माथा या नियमानुसार आधी गंगापूर तालुक्यातील गावांना पाण्याचे वितरिकेद्वारे वाटप करण्यात येईल, अशी माहिती नांमकाचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी दिली.
फोटो :
नांदूर मधमेश्वर कालव्यातून शेतकऱ्यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.
080421\1617883019-picsay_1.jpg
नांदुर मधमेश्वर कालव्यातून शेतकऱ्यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.