अखेर ‘ते’ दोघेही पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 28, 2017 23:57 IST2017-01-28T23:55:02+5:302017-01-28T23:57:34+5:30
जालना : शाळेत सोबत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने मुलीस फुस लावून पळवून नेले होते

अखेर ‘ते’ दोघेही पोलिसांच्या जाळ्यात
जालना : शाळेत सोबत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने मुलीस फुस लावून पळवून नेले होते. या विद्यार्थ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीसह सिल्लोड येथून ताब्यात घेतले आहे. दोघांनी सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
याप्रकरणी मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पोलीस अधिक्षक ज्योतिप्रियासिंह यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला दोघांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. चार दिवस पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांच्या घरी शोध घेतला. अखेर मोबाईलच्या लोकेशनवरून दोघेही सिल्लोडमध्ये असल्याचे समजताच पोलिस पथकाने दोघांनाही तेथून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)