शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुहूर्त लागला, शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू होणार; जाणून घ्या पर्यायी मार्ग

By सुमित डोळे | Updated: October 14, 2023 17:32 IST

पुढील एक वर्षासाठी शिवाजीनगर गेट बंद राहणार; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या बांधकामाला मुहूर्त लागला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याचे काम सुरू होणार असून त्यासाठी पुढील एक वर्षासाठी शिवाजीनगर गेट बंद राहणार आहे. वाहतूक पोलिस विभागाने शनिवारी दुपारी यासंदर्भाने नोटिफिकेशन जारी केले.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम रखडले होते. वेगाने वाढलेल्या देवळाई-साताऱ्यातील नागरिकांना रोज या ठिकाणी रेल्वे गेट ओलांडून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. रेल्वे आल्यानंतर गेट बंद झाल्यावर येथे वाहतूकीची मोठी कोंडी होत होती. वारंवार मागणीनंतर एक वर्षापुर्वी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून विशेष भूसंपादन विभागाला शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात भुयारी मार्गात अडथळा ठरणाऱ्या मालमत्तांच्या मुल्यांकनांसाठी सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर आता जागतिक बँक प्रकल विभागाकडून नुकतेच काम सुरू करण्यासंदर्भाने पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर वाहतूक विभागाने पाहणी करुन गेट क्रमांक ५५ ची वाहतूक १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी केले आहे. 

असा असेल पर्यायी मार्ग:

-देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डानपुलावरुन जातील व येतील.-देवळाई चौक ते गोदावरी टी पॉईंट,एमआयटी,महानुभव आश्रम चौक, रेल्वेस्थानक मार्गे जातील व येतील.-देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर भुयारी मार्गाने शहानुरमिया दर्गा चौकाकडे जातील व येतील.-देवळाई चौक ते गोदावरी टी,एमआयटी चौक, महुनगर टि पॉईंट मार्गे उस्मानपुऱ्याकडे जातील व येतील.-शिवाजीनगर,सुतगिरणी चौक ते शहानुरमिया दर्गा चौक मार्गे संग्रामनगर उड्डानपुलावरुन जातील व येतील.-शिवाजीनगर चौक,धरतीधन सोसायटी,गादीया विहार मार्गे शहानुरमिया गर्दा चौक मार्गे जातील व येतील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका