...अखेर तीन वर्गखोल्यांना मंजुरी

By Admin | Updated: February 6, 2015 00:55 IST2015-02-06T00:43:10+5:302015-02-06T00:55:19+5:30

नजीर कुरेशी ,पारडगाव पारडगाव (ता.घनसावंगी) - घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. काही वर्गखोल्यावर

... finally sanctioned to three classrooms | ...अखेर तीन वर्गखोल्यांना मंजुरी

...अखेर तीन वर्गखोल्यांना मंजुरी


नजीर कुरेशी ,पारडगाव
पारडगाव (ता.घनसावंगी) - घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. काही वर्गखोल्यावर पत्रेच नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावरच शिक्षण घ्यावे लागत होते. त्यामुळे शालेय समितीच्या अध्यक्षांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शाळेची दुरूस्ती केली होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशीत करताच शिक्षणविभागने तीन वर्गखोल्यांची नव्याने बांधणी करण्यास मंजुरी दिली आहे. बुधवारी सरंपच चंद्रभूषण जैस्वाल यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी परमेश्वर दरेकर, शालेय समितीचे उपाध्यक्ष तुकाराम भडाव, उपसरपंच भगवान टोम्पे, दिगंबर ढेरे, गंगाधर शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सातपुते, नुरमियाँ कुरेशी, सय्यद इस्माईल स.रियाज, बंडू खरात, गुलाब आढाव, शिवाजी डोळेझाके, मुुख्याध्यापक बी.एन. दवंडे, आदीसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
गावात १ ते ७ वी पर्यत उर्दू माध्यम तर १ ते ४ पर्यत मराठी माध्यमाची शाळा आहे. परंतु शाळेच्या तीन वर्गखोलयावर पत्रेच नव्हते, तर काही वर्गखोल्यांना तडे गेले आहेत. शिक्षणाचे महत्व ओळखणाऱ्या गावातील शालेय समितीच्या अध्यक्षा सिंधूताई दरेकर यांनी आपले मंगळसुत्र गहाण ठेवून आलेल्या पैशातून गावातील जि.प.प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यावर पत्रे टाकून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दुर केली होती. या बाबत ६ डिसेंबर रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.अखेर या बाबीची शिक्षण विभागाने दखल घेवून पारडगाव येथील शाळेच्या तीन खोल्या बांधण्यासाठी मंजूरी दिली. या कामाचे बुधवारी सरपंच जैस्वाल यांच्या हस्ते वर्गखोल्यांचे भूमीपूजन करण्यात आले.
शाळेच्या वर्गखोल्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले असून प्रत्यक्ष कामास एका आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी सुंध्दा आलेला आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी माहिती शिक्षणविभागाचे विस्तार अधिकारी प्रदिप जनबंधू यांनी सांगितले.
- प्रदिप जनबंधू,
विस्तार अधिकारी शिक्षणविभाग

Web Title: ... finally sanctioned to three classrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.