..अखेर परतूर ठाण्याला मिळाले पोलीस निरीक्षक
By Admin | Updated: March 27, 2016 00:07 IST2016-03-27T00:07:36+5:302016-03-27T00:07:36+5:30
परतूर : परतूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा

..अखेर परतूर ठाण्याला मिळाले पोलीस निरीक्षक
परतूर : परतूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा खेळ अखेर संपला असून, कायम पोलिस निरीक्षक म्हणून महादेव राऊत हे रूजू झाले आहेत.
परतूर पोलिस स्टेशनला मागील वर्षभरापासून निरीक्षक नव्हते. सहा ते सात पोलिस निरीक्षक आले. परंतु प्रभारी म्हणूनच तेही दोन महिने, तर काही आठ पंधरा दिवसच होते. या बदल्यांच्या खेळाने जनतेत अश्चर्य व्यक्त होत होते. हा तालुका संवेदनशील आहे. वाळू माफियांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवैध धंदे, वाहतूक, रेल्वेस्थानकात व बाहेर होणारी सततची गुन्हेगारी, चोऱ्या, इतर छोटे मोठे गुन्हे यामुळे या ठिकाणी कायम व अनुभवी पोलिस अधिकारी असणे गरजेचे असताना सतत बदल्यांचा खेळ सुरू होता.