शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर त्या मॅनहोलमध्ये आणखी एक मृतदेह सव्वा महिन्यानंतर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:13 IST

सुखना नदीपात्रातील भूमिगत गटारातून शेतीला चोरून पाणी घेण्यासाठी विद्युत मोटारपंपाचा फुटबॉल साफ करण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरल्यापासून एक जण गायब झाला होता. तेथेच शुक्रवारी २६ एप्रिल रोजी कुजलेल्या आणि सापळा अवस्थेतील मानवी मृतदेह आढळून आला.

ठळक मुद्दे१८ मार्चची घटना : ब्रिजवाडी, पॉवरलूम येथील भूमिगत ड्रेनेजलाईनमधून पाणी चोरताना मॅनहोलमध्ये गुदमरून चौथा बळी

औरंगाबाद : सुखना नदीपात्रातील भूमिगत गटारातून शेतीला चोरून पाणी घेण्यासाठी विद्युत मोटारपंपाचा फुटबॉल साफ करण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरल्यापासून एक जण गायब झाला होता. तेथेच शुक्रवारी २६ एप्रिल रोजी कुजलेल्या आणि सापळा अवस्थेतील मानवी मृतदेह आढळून आला. हा मृतदेह गायब झालेल्या रामेश्वर केरूबा डांबे (२७, रा. निकळक, ता. बदनापूर, जि. जालना) यांचा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. डीएनए चाचणी नंतरच हा मृतदेह रामेश्वरचा आहे अथवा नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुखना नदीतील भूमिगत गटाराच्या मॅनहोलमध्ये मोटारपंप टाकून शेतीसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नवनाथ कावडे, जनार्दन साबळे, रामकिसन माने, उमेश कावडे, दिनेश दराखे, प्रकाश वाघमारे आणि रामेश्वर डांबे हे मोटारपंप सुरू करण्यासाठी गेले. चेंबरमध्ये सोडलेल्या मोटारपंपच्या फुटबॉलमध्ये कचरा आणि गाळ अडक ल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाळात रुतलेला फुटबॉल बाहेर काढण्यासाठी एकापाठोपाठ चार जण मॅनहोलच्या ढाप्यावरील लघुछिद्रातून आत उतरले. मॅनहोलमधील विषारी वायूमुळे अवघ्या काही मिनिटांत ते गुदमरून चेंबरमध्येच कोसळले. यानंतर सर्वांना बाहेर काढले असता उपचारादरम्यान जनार्दन विठ्ठल साबळे (५५, रा. वरझडी), दिनेश जगन्नाथ दराखे (४०, रा. चिकलठाणा) आणि उमेश कावडे यांचा मृत्यू झाला होता. घटनेपासून रामेश्वर डांबे हा तरुण गायब झालेला आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून रामेश्वरचा शोध घेतला होता. मात्र, रामेश्वर सापडला नव्हता. दरम्यान आज शुक्रवारी घटनास्थळ परिसरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आज दुर्गंधी येत असलेल्या परिसरात खोदकाम केले असता सापळा आणि कुजलेल्या अवस्थेतील मानवी मृतदेह आढळला. हा मृतदेह रामेश्वर यांचा असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची खात्री मृतदेहाच्या डीएनए चाचणीनंतर होणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.-------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातFarmerशेतकरी