अखेर ठिबक सिंचनासाठी ३ कोटींचे अनुदान प्राप्त

By Admin | Updated: December 11, 2014 00:40 IST2014-12-11T00:16:53+5:302014-12-11T00:40:29+5:30

भोकरदन : भोकरदन - जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासून थकित असलेला ठिबक सिंचनाचा ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ़ संतोष दानवे यांनी दिली आहे़

Finally, obtaining a grant of Rs. 3 crore for drip irrigation | अखेर ठिबक सिंचनासाठी ३ कोटींचे अनुदान प्राप्त

अखेर ठिबक सिंचनासाठी ३ कोटींचे अनुदान प्राप्त


भोकरदन : भोकरदन - जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासून थकित असलेला ठिबक सिंचनाचा ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ़ संतोष दानवे यांनी दिली आहे़
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी ठिबक सिंंचन व तुषार संच शेतात बसविले आहेत. मात्र गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान शासनाकडे थकित होते. या शेतकऱ्यांचे थकित असलेले अनुदान तात्काळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औरंगाबाद भेटीमध्ये आपण पाठपुरावा करून या शेतकऱ्याना थकित असलेल्या अनुदानाची रक्कम देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील २०१२ - १३ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना सुध्दा लवकरच थकित अनुदानासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ़ संतोष दानवे यांनी सांगितले़
या अनुदानामध्ये भोकरदन तालुक्यातील ५०० शेतकऱ्याना १ कोटी ८७ लाख ९५ हजार रुपये तर जाफराबाद तालुक्यातील २०० शेतकऱ्यांना १ कोटी रूपये निधी उपलब्ध झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सन २०१२ - १३ मध्ये पहिल्या टप्प्यात शेतावर ठिबक सिंंचन केले आहे, अशा शेतकऱ्यांनी भोकरदन व जाफराबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजूर असलेल्या रक्कमेचा धनादेश लवकरच मिळणार आहे. (वार्ताहर)
२०१२-१३ या वर्षाचे ठिबक सिंचनाचे १३५७ शेतकऱ्यांचे पाच कोटी ३० लाखांचे अनुदान थकले होते. त्यापैकी ७०० शेतकऱ्यांना तीन कोटींचे अनुदान पहिल्या टप्प्यात मंजूर झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील ६५७ शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा आहे. जाफराबाद तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.
़४दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे म्हणून पाठपुरावा सुरू असल्याचे आ. दानवे यांनी सांगितले. ते अनुदानही लवकरच मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Finally, obtaining a grant of Rs. 3 crore for drip irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.