अखेर महावितरणने ५ एमव्हीएचे रोहित्र बसविले
By Admin | Updated: November 20, 2014 00:46 IST2014-11-20T00:35:18+5:302014-11-20T00:46:58+5:30
तीर्थपुरी : येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र जळाल्याने ११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे डाव्या कालव्याला पाणी असून

अखेर महावितरणने ५ एमव्हीएचे रोहित्र बसविले
तीर्थपुरी : येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र जळाल्याने ११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे डाव्या कालव्याला पाणी असून घेता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. याबाबत ‘लोकमत’ च्या १७ नोव्हेंबर रोजी हॅलो जालनाच्या अंकातील वृत्ताची दखल घेत १९ रोजी रोहित्र बसविण्याचे काम सुरू झाले. गुरुवारी शेतीसाठी वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे वीज वितरणचे उपअभियंता गुंजारगे यांनी सांगितले.
तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी रात्री जळाल्याने तीर्थपुरी, कंडारी, मुरमा, भायगव्हाण, खालापुरी, बाचेगाव, शेवता, खा. हिवरा, जोगलादेवी, रामसगाव, रूई या गावाचा शेतीचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद केला होता. केवळ तीर्थपुरी, भायगव्हाण जिनिंग हाच गावठाणचा वीजपुरवठा दुसऱ्या ५ एमव्हीएवरून सुरू होता.
दरम्यान, या गावाला जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरून अनेकांनी कर्ज काढून पाईपलाईन केलेली असताना व डाव्या कालव्याला पाणी पाळी चालू असताना केवळ वीज पुरवठा बंद असल्याने पिकांना ते देता येत नव्हते. यामुळे शेतकरी हैराण झाले होते.
लोकमतने या प्रश्नावर वाचा फोडली आणि लगेच तातडीने ५ एमव्हीएचा रोहित्र बसवला. १९ रोजी तो पूर्ण बसवून चार्ज करण्याचे काम एक दिवस चालणार असून, २० रोजी रात्री वरील ११ गावातील शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)