अखेर ‘ईआरपी’ची चौकशी सुरू
By Admin | Updated: May 12, 2016 00:58 IST2016-05-12T00:09:52+5:302016-05-12T00:58:32+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील संपूर्ण कारभार संगणकावरच व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आठ वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून प्रशासनाने अत्याधुनिक ‘ईआरपी’ सॉफ्टवेअरची खरेदी केले होती.

अखेर ‘ईआरपी’ची चौकशी सुरू
बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना निव्वळ दिखावा आहे. योजनांच्या अंमलबजावणीत अटी, शर्थींची मेख मारुन ठेवली असल्याचा आरोप जि.प. चे अर्थ व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांनी केला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांबद्दल कोरडी सहानुभूती दाखवू नका, मोफत खत- बियाणे द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.
‘लोकमत’ला बुधवारी संदीप क्षीरसागर यांनी मुलाखत दिली. यात त्यांनी दुष्काळी परिषद राष्ट्रवादीचीच होती, मी फक्त आयोजक होतो, असे सांगितले. बॅनरवर कोणाचा फोटो नव्हता याच्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळ परिषदेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडता आली. दुष्काळात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रकर्षाने पुढे आले, ते हायकमांडसमोर ठेवता आले. दुष्काळ परिषदेत कर्जमाफी, वीजबिल माफीसारखे महत्त्वाचे विषय झाले. ते विधीमंडळात मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अजित पवार व आ. जयदत्त क्षीरसागर हे नक्की प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बीड तालुक्यात बुडीत क्षेत्रात १८० विहिरी खोदल्या असून वैयक्तिक लाभाच्या साडेतीन हजार विहिरींना मंजुरी दिलेली आहे. जलसंधारणाची कामेही गतीने सुरु आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना वैयक्तिक लाभाच्या विहिरी देऊन त्यांना संकटातून सावरण्याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले. बीड कृउबाला नावारुपाला आणण्याचे काम आ. क्षीरसागर यांनी केले आहे. त्यामुळे विरोधक केवळ बदनामीसाठी आरोप करत आहेत. कृउबा निवडणुकीत राकॉचेच पॅनल जिंंकेल, असा विश्वास संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळा गट वगैरे... असे सध्या तरी डोक्यात नाही. फक्त काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळाला पाहजे, असा माझा आग्रह असल्याचे ते म्हणाले. मी जिल्ह्याच्या राजकारणात उडी घेतोयं अशी चर्चा आहे. पण आता लोकांनीच ते ठरवावे, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
परिषद पक्षाची होती, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी होती. हा काही वाढदिवसाचा सत्कार नव्हता. माझ्या जीवनातील पक्षाचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते.
४पालिकेतील काही नगरसेवक परिषदेला आले हे खरे आहे; पण त्या नगरसेवकांचे बंड पक्षाविरोधात नाहीच, ते एका व्यक्तीविरोधात आहे. त्यामुळे ते परिषदेला आले, यात गैर काय? असा प्रतिप्रश्न करुन संदीप क्षीरसागर यांनी नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले.
जि. प. च्या इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत कोणावे नाव असावे? यावरुन अध्यक्ष विजयसिंह पंडित व सभापती संदीप क्षीरसागर यांच्यात एकमत होत नसल्याने रखडले आहे. या प्रश्नावर उत्तर देताना संदीप क्षीरसागर म्हणाले, ‘प्रोटोकॉल’नुसार पत्रिका छापाव्यात एवढेच माझे म्हणणे आहे. दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे गाजावाजा करुन कार्यक्रम घ्यायचा कशाला? अशी भूमिका मी मांडली आहे. त्याऐवजी थेट लोकार्पण सोहळा घेता येईल. सध्या उद्घाटनांपेक्षा शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.