अखेर दिव्यांग ‘साहिल’ भारतीय समाजसेवा केंद्रात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:35+5:302021-07-07T04:06:35+5:30
औरंगाबाद : घाटीत बाह्यरुग्ण विभागासमोर सोडून दिलेल्या ४ वर्षीय दिव्यांग बालकाला मंगळवारी भारतीय समाज सेवा केंद्राच्या ताब्यात देण्यात आले. ...

अखेर दिव्यांग ‘साहिल’ भारतीय समाजसेवा केंद्रात दाखल
औरंगाबाद : घाटीत बाह्यरुग्ण विभागासमोर सोडून दिलेल्या ४ वर्षीय दिव्यांग बालकाला मंगळवारी भारतीय समाज सेवा केंद्राच्या ताब्यात देण्यात आले. या बालकाचे ‘साहिल’ असे नामकरण करण्यात आले असून, गेले ४ दिवस घाटीतील डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी साहिलचा सांभाळ केला.
घाटीत ४ दिवस दाखल असताना बालकाविषयी विचारणा करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. घाटीच्या ओपीडीसमोर ३ जुलै रोजी साहिल आढळून आला होता. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार पुनर्वसनासाठी त्याचा ताबा भारतीय समाज सेवा केंद्राकडे देण्यात आला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तृप्ती जोशी, डॉ. उबेद रहमान, डॉ. प्रियंका घोंगडे, डॉ. अंजुम अशोकन, डॉ. उमेश नेतंम, डॉ. निखिल रेड्डी, डॉ. पायल निकोसे, ब्रदर विशाल ब्रदर यांच्यासह परिचारिकांनी साहिलची काळजी घेतली. बाल कल्याण समिती, बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे समन्वय साधण्याचे काम समाज सेवा अधीक्षक संतोष पवार यांनी पाहिले. बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक ज्योती गात, पोलीस काॅन्स्टेबल रियाज यांच्यासोबत बालकाला भारतीय समाज सेवा केंद्रात पाठवण्यात आले.
डोळे कुटुंबीयांकडे
घाटीतील वाॅर्ड क्रमांक-२५ मध्ये या बालकाला दाखल करण्यात आले होते. तेव्हा कोणीतरी येईल आणि आपल्याला इथून घेऊन जाईल, अशी त्याला आशा असल्याचे या बालकाचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
-----
फोटो ओळ..
घाटीत ओपीडीसमोर सोडून दिलेल्या ४ वर्षीय दिव्यांग बालकाला मंगळवारी भारतीय समाज सेवा केंद्राच्या ताब्यात देण्यात आले.