...अखेर पांडव यांना हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:06+5:302021-06-24T04:04:06+5:30

--- औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर. एम. ...

... finally deleted the Pandavas | ...अखेर पांडव यांना हटविले

...अखेर पांडव यांना हटविले

---

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर. एम. पांडव यांना अखेर हटविण्यात आले आहे. त्यांचा पदभार रसायन तंत्रज्ञान (केमिकल टेक्नाॅलाॅजी) विभागाचे डाॅ. भगवान साखळे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

विद्यापीठात गोपीनाथ मुंडे संस्थेचा पदभार डॉ. ठोंबरे यांच्यानंतर डॉ. पांडव यांच्याकडे देण्यात आला होता. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार स्वीकारल्यावर विद्यापीठातील विविध अध्यासन केंद्रांचे संचालक हे विद्यापीठातील प्राध्यापक असावेत असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडे असलेले अध्यासन केंद्राचे संचालक पद काढून घेण्यात आले. मात्र, गोपीनाथ मुंडे संस्थेचे संचालकपद डाॅ. पांडव यांच्याकडे कायम ठेवले. तेव्हा त्यांना हटविण्यासाठी व्यवस्थापन परिषदेत जोरदार मागणी केली गेली. त्यावेळी पांडव यांचा कार्यकाळ सहा महिने राहिल्याचा निर्वाळा देण्यात आला. मात्र, हा कार्यकाळ संपल्यावर त्यांच्या जागी डॉ. साखळे यांची नियुक्ती केली होती. त्यात राज्यपाल कार्यालयाकडून हस्तक्षेप करून पांडव यांची पाठराखण केली. यावर नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दीड तास जोरदार खडाजंगी झाली. त्यात कुलगुरुंनी एका महिनाभरात राजभवनाशी संपर्क साधून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी निर्णय घेत डॉ. पांडव यांना हटवून डॉ. साखळे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत पदभार सोपविला आहे. त्यांनी बुधवारी डाॅ. पांडव यांच्याकडून पदभार स्वीकारला.

Web Title: ... finally deleted the Pandavas