शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जळगाव रोड घेणार मोकळा श्वास; हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:45 IST

हर्सूल गावात येणारा व गावातून सावंगीकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

औरंगाबाद : शहर ते सिल्लोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आज सकाळपासून हर्सूल येथील संपादित मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे हर्सूल गावातून वाहतूक चार दिवस बंद करण्यात आली आहे. 

हर्सूल गावातील संपादित होणाऱ्या मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीला जी २० च्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार सोमवार (दि. १३) ते गुरुवारपर्यंत चार दिवस भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, आज सकाळी गावातील मालमत्ता पाडापाडीचे काम सुरु झाले आहे. काही बाधित मालमत्ता मधील सामान नागरिकांनी स्वतःहून रविवारी काढून घेतले.

चार दिवस वाहतूक राहणार बंद हर्सूल गावात येणारा व गावातून सावंगीकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. शहरातून हर्सूल गावातून फुलंब्रीकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉईंटवरून आंबेडकरनगर चौक ते पिसादेवी बायपास अशी पुढे जाईल. फुलंब्री, सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी वाहतूक सावंगी नाका येथून वळवून सावंगी बायपास मार्गे नारेगाव, वोखार्ड टी अशी पुढे जाईल. या सूचना अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांसाठी लागू असणार नाहीत, असे सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेश मयेकर यांनी कळविले आहे.

गजानन महाराज मंदिर चौकातही बदलगजानन महाराज प्रकट दिनानिमित्त (दि.१३) भाविक मोठ्या संख्येने गजानन महाराज मंदिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता ते १३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत गजानन महाराज मंदिर चौक ते हेडगेवार हॉस्पिटल चौक हा रस्ता वाहनांच्या प्रवेशासाठी बंद असणार आहे. या मार्गावर येणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक जे.बी. शेवाळे यांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादhighwayमहामार्ग