...अखेर बिंदू नामावली मंजूर

By Admin | Updated: June 16, 2017 23:36 IST2017-06-16T23:32:46+5:302017-06-16T23:36:23+5:30

नांदेड:बिंदू नामावली मंजूर झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार ८५२ शिक्षकांची पदे मंजूर होणार आहेत

... finally approved the point credits | ...अखेर बिंदू नामावली मंजूर

...अखेर बिंदू नामावली मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग आता मोकळा झाल्याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे़ बिंदू नामावली मंजूर झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार ८५२ शिक्षकांची पदे मंजूर होणार आहेत.
यापूर्वी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण किचकट व वेळखाऊ होते़ संबंधित शिक्षकाला स्वत:ची आंतरजिल्हा बदली करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्यावर मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागत होते़ त्यानंतर हा प्रस्तावावर ज्या जिल्हा परिषदेत बदली करून घ्यायची आहे, तेथे सादर करावा लागत होता़ या प्रक्रियेत संबंधित शिक्षकांचा वेळ वाया जात होता़ तसेच प्रस्तावही पुढे जात नव्हता़
त्यामुळे अनेक शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असूनही प्रस्ताव तयार करत नव्हते़ तर काही शिक्षक प्रस्ताव सादर केल्यानंतरही बदलीची आशाच सोडून देत होते़ मात्र यावर्षी शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले़ आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित जिल्ह्याची बिंदू नामावली तयार करणे आवश्यक आहे़ परंतु अनेक जिल्हा परिषदांनी बिंदू नामावलीच तयार केली नाही़ तर नांदेड जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीची १२ वर्षांपासून तपासणीच झाली नव्हती़ २००४ मध्ये बिंदू नामावली मागासवर्ग कक्ष, औरंगाबाद यांच्याकडून तपासली होती़
१२ वर्षे होवून गेले मात्र अद्याप बिंदू नामावलीची तपासणी झाली नसल्याने काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता़ रोष्टरनुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्रशासन जाणीवपूर्वक रोष्टर मंजूर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही करण्यात आला़
दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रोष्टर १५ जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात मंजूर झाल्याचे सूत्रांनी सांगितले़ आंतर जिल्हा बदलीच्या १६२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

Web Title: ... finally approved the point credits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.