शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

अखेर मोठा पेच सुटला, दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार छत्रपती संभाजीनगर मनपाच करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:15 IST

दोन महिन्यांच्या पगाराने दिवाळी गोड हाेणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील तब्बल दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्या गंभीर बनला होता. पगार कसा आणि कोणी करावा, या मुद्यावर मागील काही दिवसांपासून खल सुरू होता. सोमवारी प्रशासनाने यात मार्ग काढला. मंगळवारी लेखा विभागामार्फतच थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा केला जाणार आहे. कोणतीही अनावश्यक कपात न करता भरीव पगार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

महाराणा एजन्सीमार्फत मनपात १६०० कर्मचारी घेण्यात आले आहेत. मागील महिन्यात मनपाने एजन्सीचे काम थांबविले. एजन्सीकडील सर्व कर्मचारी गॅलक्सी आणि अशोका या दोन एजन्सीकडे वर्ग केले. जून आणि जुलै महिन्याचा कर्मचाऱ्यांचा पगार कसा करावा, हा पेच होता. महाराणा एजन्सीमार्फत प्रशासनाला कर्मचाऱ्यांचा पगार करायचा नव्हता. नवीन एजन्सींना जुन्या दोन महिन्यांचे पैसे देता येत नाहीत. मनपा प्रशासनाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले, तर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

कायदेशीर अडचणी तपासण्यात आलीमागील आठ ते दहा दिवसांपासून प्रशासनस्तरावर जोरदार खल सुरू होता. थकीत पगारासाठी कर्मचारी कामबंद आंदोलन, मनपासमोर धरणे, निदर्शने करू लागले. विषय पालकमंत्र्यांपर्यंत गेला. त्यांनीही मनपा प्रशासनाला यात मार्ग काढण्याची सूचना केली. सोमवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कायदेशीर अडचणही तपासण्यात आली. मनपाने थेट कर्मचाऱ्यांचा पगार केल्यास कायदेशीर अडचण येणार नाही, असे चर्चेत समोर आले. त्यानंतर प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जून आणि जुलै महिन्याचा पगार करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

ऑगस्ट महिन्याची प्रक्रिया सुरूऑगस्ट महिन्याचा पगारही मनपा प्रशासनच करणार आहे. त्याचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली. हजेरी ॲपनुसार तपासून हा पगार केला जाईल. भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसीची रक्कम कपात करून उर्वरित सर्व रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

कायमस्वरूपीचा दावा ठोकू शकतातबाह्यस्त्रोत मार्फत कर्मचारी घेण्याचे एकच कारण की, भविष्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्याला कायम करा म्हणून दावा करू नये. आता मनपाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले तर ते न्यायालयात दावा दाखल करू शकतील, ही भीती आहे. मात्र, प्रशासनाने ही शक्यता फेटाळून लावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation to Pay 2000 Contract Workers

Web Summary : The Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will directly pay salaries to 2000 contract workers, resolving a payment issue. The decision ensures timely payments, especially benefiting workers before Diwali. Legal aspects were considered before this resolution.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका