अंतिम पैसेवारीसाठी प्रस्तावांचे संकलन

By Admin | Updated: November 19, 2014 00:59 IST2014-11-19T00:54:52+5:302014-11-19T00:59:31+5:30

लातूर : सुधारीत पैसेवारी जाहीर झाली असून ती ५० पैशांपेक्षा कमी आहे़ प्रत्येक पिकाची पैसेवारी काढल्यानंतर आता ग्रामपंचायतनिहाय पैसेवारी जाहीर केली जाणार आहे़

Finalization of proposals for final payment | अंतिम पैसेवारीसाठी प्रस्तावांचे संकलन

अंतिम पैसेवारीसाठी प्रस्तावांचे संकलन


लातूर : सुधारीत पैसेवारी जाहीर झाली असून ती ५० पैशांपेक्षा कमी आहे़ प्रत्येक पिकाची पैसेवारी काढल्यानंतर आता ग्रामपंचायतनिहाय पैसेवारी जाहीर केली जाणार आहे़ तहसीलस्तरावरुन अंतीम पैसेवारीचे प्रस्ताव त्यासाठी संकलित केले जात आहेत़ तहसीलस्तरावरुन जिल्हाधिकारी कार्यालयात ते सादर होतील़ अंतिम पैसेवारी जाहीर करण्यापूर्वी त्या वर्षातील पर्जन्यमान, पीक कापणी प्रयोगाचे निकष व बाजार समितीकडे आलेल्या धान्याची आवक याची मोजदात केली जाणार आहे़ त्यानंतर अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर होईल़ सध्या ५० पैशापेक्षा कमी आणेवारी आहे. ती यापेक्षा २० ते ३० पैशापेक्षा कमी होण्याची शक्यता महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीच वर्तविली आहे.
यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप पीक उत्पन्नात कमालिची घट झाली असून, ८० टक्के क्षेत्रावरील पिकाची परिस्थिती दैनिय झाली होती़ जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावरील पीक पैसेवारी समितीच्या निकषानुसार जिल्ह्यातील ९४३ गावांमध्ये पिकांची सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आहे़ पीक पैसेवारी जिरायत पिकाच्या उत्पन्नावर काढली असून, या वर्षातील पर्जन्यमान, पीक कापणी प्रयोगाचे निकष व बाजार समितीकडे झालेल्या धान्याची आवक या बबीकडे लक्ष देऊन ही सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे़ अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर होणार आहे़ दरम्यान जिल्ह्यात खरीप पीक उत्पन्नाची स्थिती वाईट असल्याचेच या पैसेवारीतून समोर आले आहे़
लातूर जिल्ह्यात खरिपाची ८२६ आणि रबीची ११७ असे एकूण ९४३ गावे आहेत़ रबीच्या ११७ गावांतही खरीपाचाच पेरा होतो़ त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने खरीपातील पिकांची पैसेवारी जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने जाहीर केली आहे़ हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबरला व सुधारीत हंगामी पैसेवारी १५ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली़ ३० सप्टेबरला जाहीर करण्यात आलेली हंगामी पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधीक होती़ मात्र सुधारीत पैसेवारीत उत्पन्नाची मोजदात झाल्यानंतर ती ५० पैसेपेक्षा कमी झाली आहे़ लातूर तालुक्यातील ११८, औसा तालुक्यातील १३०, रेणापूर तालुक्यातील १७६, उदगीर तालुक्यातील ९९, अहमदपूर तालुक्यातील १२४, चाकूर तालुक्यातील ८५, जळकोट तालुक्यातील ४७, देवणी तालुक्यातील ५४, निलंगा तालुक्यातील १६२ आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ४८ अशा एकूण ९४३ गावांत ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आहे़
यात रबी पीक घेणारे गाव म्हणून उल्लेख असलेल्या पण त्या गावात खरिपाचीच जिरायत पिके घेतलेल्या गावांचा समावेश आहे़ लातूर तालुक्यात रबी पिकांची गावे ५१, औसा तालुक्यात २६, रेणापूर तालुक्यात १४, उदगीर तालुक्यात १, देवणी तालुक्यात ११, निलंगा तालुक्यात १३, शिरुर अनंतपाळ तालुक्यात १ अशा एकूण ११७ गावांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Finalization of proposals for final payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.