‘त्या’ संस्थांना अंतिम नोटीस बजावणार

By Admin | Updated: November 6, 2016 00:28 IST2016-11-06T00:21:03+5:302016-11-06T00:28:05+5:30

बीड : आता जि. प. प्रशासन अंतिम नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे.

The final notice will be issued to those 'organizations' | ‘त्या’ संस्थांना अंतिम नोटीस बजावणार

‘त्या’ संस्थांना अंतिम नोटीस बजावणार

बीड : अतिरिक्त शिक्षकांना आॅनलाईन समायोजनानंतर रूजू करून न घेता वेठीस धरणाऱ्या संस्थांना जिल्हा परिषदेमार्फत आता तीन नोटीस देण्यात आल्या आहेत. आता जि. प. प्रशासन अंतिम नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे.
जिल्ह्यात खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक संस्थांमध्ये अनुक्रमे ४२ आणि १६२ शिक्षक अतिरिक्त होते. २१ व २२ सप्टेंबर २०१६ रोजी आॅनलाईन समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली होती. रिक्त जागांवर २६ प्राथमिक व ६८ माध्यमिक शिक्षकांना सामावण्यात आले. उर्वरित शिक्षकांचा अहवाल शिक्षण संचालकांना पाठविण्यात आला होता. समायोजन झालेल्या शिक्षकांना जि. प. ने रुजू आदेशही दिले; परंतु खासगी संस्थांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. जिल्हा परिषदेने आतापर्यंत अतिरिक्त शिक्षकांना रूजू न करणाऱ्या संस्थांना तीन नोटीस बजावल्या आहेत. याउपरही संस्थांनी दाद न दिल्यास रिक्त पद गोठवून अनुदान बंद करण्याची शिफारस शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The final notice will be issued to those 'organizations'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.