पोलिस भरतीचा तात्पुरता अंतिम निकाल घोषित

By Admin | Updated: June 17, 2014 00:52 IST2014-06-17T00:49:53+5:302014-06-17T00:52:58+5:30

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परिक्षेनंतर सोमवारी तात्पुरता अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे़

The final final result of recruitment is announced | पोलिस भरतीचा तात्पुरता अंतिम निकाल घोषित

पोलिस भरतीचा तात्पुरता अंतिम निकाल घोषित

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परिक्षेनंतर सोमवारी तात्पुरता अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे़
७२ जागांसाठी ६ जूनपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती़ ही सर्व भरती प्रक्रिया विनातक्रार पार पाडली़ उत्कृष्ट नियोजनामुळे भरती प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झाली नाही़ रविवारी पात्र ठरलेल्या ८०२ उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली़ त्यानंतर सोमवारी तात्पुरता अंतिम निकाल घोषित करण्यात आला़ त्यात सामाजिक आरक्षण- खुला प्रवर्ग-१७३, विशेष मागास वर्ग-१६४, इतर मागास वर्ग-१६१, समांतर आरक्षण- महिला-१२५, खेळाडू-१४४, प्रकल्पग्रस्त-१६५, भूकंपग्रस्त-१४५, होमगार्ड-१४५, माजी सैनिक-१२३, अंशकालीन-७९ गुण़ प्रवर्गनिहाय गुणांप्रमाणे किमान गुणांच्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे़
सदरचा तात्पुरता अंतिम निकाल हा पोलिस मुख्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय येथील सुचना फलकावर लावण्यात आला आहे़ तसेच पोलिस दलाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे़ निवड सुचीबाबत उमेदवारांच्या काही शंका असल्यास सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The final final result of recruitment is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.