फिल्टरबेड रस्त्याची लागली वाट !

By Admin | Updated: February 3, 2015 00:57 IST2015-02-03T00:28:36+5:302015-02-03T00:57:48+5:30

जालना : वारंटवॉर्ड ते फिल्टरबेड दरम्यानच्या नव्या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे.

Fill the filterbed road! | फिल्टरबेड रस्त्याची लागली वाट !

फिल्टरबेड रस्त्याची लागली वाट !


जालना : वारंटवॉर्ड ते फिल्टरबेड दरम्यानच्या नव्या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. ‘लोकमत’ने रविवारी दुपारी या रस्त्याचा आॅन द स्पॉट पंचनामा केला.
काळे चौकापासून सुरु झालेल्या रस्त्याचे जुन्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून नव्याने डांबरीकरण करण्यात आले. वॉरंटवॉर्ड ते फिल्डरबेड दरम्यानचा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता आहे. रस्त्याचा अर्धा भाग चांगला असला तरी अनेक भाग खड्ड्यांनी व्यापले आहेत. फिल्टरबेड पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्याला कुठल्याही तज्ज्ञाची गरज भासत नाही. डांबर व अत्यल्प खडीमुळे रस्ता काही दिवसांतच पूर्णपणे उखडण्याची चिन्हे आहेत. बुंदेले चौकच्या डाव्या व उजव्या बाजूस जीवघेणे खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघात होतात. तर उन्हाळ्यामध्ये सर्वत्र धूळ उडते. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मोठ्या वाहनाच्या मागे पादचारी व दुचाकीस्वार जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
विशेषत: बुंदेले चौकात खड्ड्यांचे साम्राज्य जास्त आहे. देऊळगावराजाकडून शहरात प्रवेश करण्यासाठी हाच महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची संख्या कमी असूनही रस्ता खड्डेमय होतो आहे. रस्त्यासाठी २० लाख ९२ हजार ८०० रुपये एवढा खर्च झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fill the filterbed road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.