शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर शहरात दोन ठिकाणी दगडफेक

By admin | Published: June 08, 2014 1:09 AM

औरंगाबाद : ‘व्हॉटस् अ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’ च्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट केल्यानंतर शहरात दोन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

औरंगाबाद : ‘व्हॉटस् अ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’ च्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट केल्यानंतर शहरात दोन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पोलीसांना कडक बंदोबस्त लावला आहे. गारखेडा परिसरातील शंभूनगर परिसरात दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री १०० ते १२५ जणांच्या संतप्त समूहाने या परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरामुळे ६ वाहनांचे नुकसान झाले, तर एक जण जखमी झाला. एका गटाने दिलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून, पहाटेपासून धरपकड मोहीम राबविली आहे. या परिसरात काल रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असली तरी आज शनिवारी सायंकाळी १०-१५ जणांच्या टोळक्याने विभागीय क्रीडा संकुल परिसरातील दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना बळजबरी केली. हा प्रकार सुरू असताना परिसरात अफवांचे पेव फुटले. या परिसरात दगडफेक सुरू असल्याचा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षाला गेला. नियंत्रण कक्षाकडून जवाहरनगर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेण्याची सूचना मिळाली. त्यानुसार पोलिसांचा मोठा फौजफाटा क्रीडा संकुल चौकात दाखल झाला. तेव्हा ती निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. फेसबुकवर महापुरुषाची विटबंनाफेसबुक या सोशल साईटवर पंजाब येथील एका जणाने महापुरुषाचे आक्षेपार्ह चित्र व मजकूर अपलोड केल्याने शनिवारी रात्री वातावरण तापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप शिरसाठ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक ठाण्यात धाव घेऊन सदरील समाजकंटकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन परिसरात बंदोबस्त वाढविला. दरम्यान, जवाहर कॉलनी परिसरातील काही तरुण घोषणाबाजी करीत आकाशवाणी चौकात आले. तेथे त्यांनी काही वाहनांवर दगडफेक केली. या घटनेमुळे जालना रोडवर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तरुणांचा हा फौजफाटा नंतर कैलासनगर, रेंगटीपुरा भागात जावून घोषणाबाजी करीत होता. तेथे पोलीस पोहोचेपर्यंत तरुण पसार झाले होते. शहरात तणाव वाढत असल्याने वेगवेगळ्या वसाहतींमध्ये ५० ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले. आयुक्तालयातील स्ट्रायकिंग फोर्सही तैनात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.