अवैध सावकारीचा मुखेडात गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 5, 2017 00:19 IST2017-07-05T00:14:21+5:302017-07-05T00:19:50+5:30
मुखेड : व्याजाचे पैसे देऊनही शेत परत न करणाऱ्या सावकाराविरूद्ध मुखेड पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल नोंदविण्यात आला.

अवैध सावकारीचा मुखेडात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड : व्याजाचे पैसे देऊनही शेत परत न करणाऱ्या सावकाराविरूद्ध मुखेड पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल नोंदविण्यात आला.
बेरळी बु. (ता. मुखेड) येथील भुजंग गणपती जुन्ने या सावकाराने फिर्यादीचे शेत १९९५ रोजी सात टक्के व्याजदराने गहाण ठेवून पैसे दिले. त्या मोबदल्यात फिर्यादीच्या भावाकडून आपल्या नावे शेत करुन घेतले़ शेताचे पैसे दिल्यानंतरही सावकाराने शेत परत केले नाही.
या आशयाची तक्रार दुय्यम निबंधक कार्यालयात दिली होती. तपास फौजदार ओमकार गिरी करीत आहेत.