नगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: June 20, 2014 00:18 IST2014-06-20T00:18:45+5:302014-06-20T00:18:45+5:30
गंगाखेड : गंगाखेड येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक सहा महिन्यांसाठी लांबली असली तरी राजकीय वातावरण वेगळे वळण घेत आहे़

नगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हे दाखल
गंगाखेड : गंगाखेड येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक सहा महिन्यांसाठी लांबली असली तरी राजकीय वातावरण वेगळे वळण घेत आहे़ १८ जून रोजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्यासह इतर पाच जणांवर अपहरणासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे़
येथील नगरपालिकेतील नगरसेवक पळवापळवीचे प्रकरण ३० मे पासून कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत आहे़ १८ जून रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास प्रभाग ६ मधून निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक राजू उर्फ गजानन त्र्यंबकराव सावंत यांचे अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या मातोश्री शोभाताई त्र्यंबकराव सावंत (रा़ आंबेडकरनगर, गंगाखेड) यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात दिली़ त्यांच्या तक्रारीवरून नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्यासह नगरसेवक राजेश जाधवर, मनोहर महाराज केंद्रे, नंदू पटेल, शेख अफजल, पं़ स़ चे माजी सभापती श्रीनिवास मुंडे यांच्याविरूद्ध अपहरण आणि अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे़ गंगाखेड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)
जामीन फेटाळला
३० मे रोजी विलास जंगले यांनी पद्मीनबाई जंगले या नगरसेविकेचे अपहरण केल्याची तक्रार दिली होती़ या प्रकरणात १९ जून रोजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, मनोहर महाराज केंद्रे, बाळू काबरा यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे़