शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

औरंगाबाद नगररचना विभागात फायलींचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:18 AM

महापालिकेच्या नगररचना विभागात मागील काही महिन्यांपासून शासन नियुक्त अधिकारीच नसल्याने शेकडो फायलींचा डोंगर साचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या नगररचना विभागात मागील काही महिन्यांपासून शासन नियुक्त अधिकारीच नसल्याने शेकडो फायलींचा डोंगर साचला आहे. फायलींचा निपटारा होत नसल्याने महापालिकेच्या महसुलावरही मोठा परिणाम होत असल्याने मंगळवारी आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी शासनाच्या नगररचना विभागाच्या संचालकांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. त्वरित मनपाला अधिकारी द्यावा, अन्यथा मनपाला स्वत:चा अधिकारी नेमावा लागेल, असे मतही त्यांनी मांडले.नगररचना विभागात सहायक संचालक पदावर शासनाकडून अधिकारी नियुक्त करण्यात येतो. काही महिन्यांपूर्वीच शासनाकडून आलेले अधिकारी आलूरकर यांनी दीर्घ रजा टाकली. त्यांचा पदभार शासनाने थत्ते यांच्याकडे सोपविला. थत्तेही दीर्घ रजेवर निघून गेल्याने शासनाने परत मुद्दसीर यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला; मात्र मुद्दसीर यांनी महापालिकेत येऊन पदभारच स्वीकारला नाही. २९ नोव्हेंबरपासून हा सर्व खेळ सुरू आहे. मागील तीन महिन्यांपासून एकही फाईल या विभागाकडून मंजूर झालेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल रखडला आहे. नगररचना विभागात प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाच्या टेबलवर फायलींचा डोंगर साचला आहे. ८० टक्के फायली फक्त सहायक संचालकांच्या सहीसाठी पडून आहेत. बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, गुंठेवारी, टीडीआर आदी फायली मंजूर झाल्यावर महापालिकेला मोठी रक्कम प्राप्त होते.मंगळवारी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी शासनाच्या नगररचना विभागातील संचालकांसोबत या विषयावर चर्चा केली. तुमचे अधिकारी महापालिकेत काम करण्यासाठी रुजू होत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्हाला आमचा अधिकारी नेमण्याची मुभा द्या, असा इशारा आयुक्तांनी दिला. दोन ते तीन दिवसांमध्ये शासनाने सहायक संचालक या पदावर अधिकारी नियुक्त न केल्यास महापालिका पूर्वीप्रमाणे आपल्याच अधिकाºयांकडून काम करून घेणार आहे.