खत विक्रेत्याविरूद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 25, 2014 01:04 IST2014-06-25T00:58:47+5:302014-06-25T01:04:59+5:30
देवणी : खताची अवैैध वाहतूक करणाऱ्या एकास मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

खत विक्रेत्याविरूद्ध गुन्हा दाखल
देवणी : देवणी येथे खताची अवैैध वाहतूक, खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने सदरील कृत्य करणाऱ्या विक्रेत्याला मुद्देमालासह अटक करून त्याच्याविरूद्ध कृषी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वलांडी येथील लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्राचे चालक लक्ष्मीकांत बंग हे २३ जून रोजी डी़ए़पी़ या खताचा ट्रक देवणी येथील पाटील सेवा केंद्र व मोदी सेवा केंद्र यांना अवैैधरीत्या खरेदी-विक्री करण्यासाठी पाठविले़ या ट्रकमधील २०० पोते खत एका सेवा केंद्राअंतर्गत उतरविला़ उर्वरित १४० पोते खत उतरविण्याच्या प्रयत्नात असताना याचा सुगावा मनसे पदाधिकाऱ्यांना लागला त्यांनी या अवैैध खताच्या ट्रकवर छापा टाकला़ या घटनेची माहिती संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली़ यावरून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन घटनेची चौकशी केली़ तेथील खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी सतीश पाटील यांनी रीतसर देवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली़
याप्रकरणी कृषी सेवा केंद्र चालकाविरूद्ध कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २३ जून रोजी कलम ई़सी़अॅक्टप्रमाणे मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, सेवा केंद्राचे चालक लक्ष्मीकांत बंग यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे़ तसेच ट्रक व त्यामधील १४० पोती खत जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक एस़एस़आम्ले करीत आहेत़ सदर सेवा केंद्र चालकाने हा खत औराद येथील चाकोते कृषी सेवा केंद्रातून आणल्याची माहिती समोर आली आहे़ (वार्ताहर)
कृत्रिम टंचाई निर्माण करून लुबाडणूक
सध्या देवणी शहरात खताची टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या विके्रत्यांची टोळीच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे़
वरिष्ठ पातळीवर अवैैध खत विक्रीची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे़ यामुळे अवैैध खत विक्रीचे वलांडी हेच मुख्य केंद्र असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे़