पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 6, 2015 23:53 IST2015-09-06T23:42:39+5:302015-09-06T23:53:14+5:30
भोकरदन : येथील रामेश्वर शिक्षण संस्थेत बनावट कागदपत्र तयार करून धर्मादाय आयुक्त्याच्या शेड्युलवरील नावात बदल करून बनावट अध्यक्ष व सचिव नियुक्त करून संस्थेच्या

पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
भोकरदन : येथील रामेश्वर शिक्षण संस्थेत बनावट कागदपत्र तयार करून धर्मादाय आयुक्त्याच्या शेड्युलवरील नावात बदल करून बनावट अध्यक्ष व सचिव नियुक्त करून संस्थेच्या देणगीचा अपहार केल्याप्रकरणी प्राचार्य, तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणां विरूद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष तोताराम पुंडलिक जाधव यांनी ३० जून रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यावरून न्यायालयाने याबाबत गुन्हे दाखल करून चौकशी करण्याचे आदेश ४ सप्टेंबर रोजी दिले.
त्यावरून रविवारी भोकरदन पोलिस ठाण्यात शिक्षण संस्थेत बनावट कागदपत्र तयार करून संस्थेचे अध्यक्ष, सचिव म्हणून धर्मादायमध्ये नोंद करणे, संस्थेत बोगस शिक्षकांची नियुक्ती करणे, व संस्थेच्या खात्यातून व्यवहार न करता संस्थेला मिळेलेल्या लाखो रूपयांच्या देणग्याचा अपहार केल्याप्रकरणी प्राचार्य प्रकाश वाघ, अध्यक्ष लक्ष्मण गिऱ्हे, केशव जंजाळ, नंदकुमार गिऱ्हे व तत्कालिन शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.एच. शेवाळे या पाच जणांविरूद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)