कामगारास मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:04 IST2021-07-07T04:04:21+5:302021-07-07T04:04:21+5:30

वाळूज महानगर : कंपनीत अपघातानंतर औषधोपचाराला पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगारास मारहाण करणाऱ्या उद्योजक व त्याच्या पत्नीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ...

Filed a case against a couple who beat up a worker | कामगारास मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

कामगारास मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : कंपनीत अपघातानंतर औषधोपचाराला पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगारास मारहाण करणाऱ्या उद्योजक व त्याच्या पत्नीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित हरिश्चंद्र राजपूत (२८ रा.वडगाव) हा वाळूज एमआयडीसीतील रिना इंडस्ट्रिज या कंपनीचा कामगार आहे. गत महिन्यात ३ जूनला कंपनीत काम करतांना रोहित राजपूत याला अपघात झाला होता. त्यामुळे तो कामावर जात नव्हता. शनिवारी रोहित राजपूत याने कंपनी मालक रमाकांत राठोड यांच्या घरी जात औषधोपचारासाठी पैशाची मागणी केली. मात्र राठोड यांनी पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली. या दोघांत वाद सुरु असतांना रमाकांत राठोड याची पत्नी रिना राठोड हिने लोखंडी रॉड आणून रोहित यांच्या डोक्यात मारला. याप्रकरणी दोघा पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------------

बजाजनगरातून महिला बेपत्ता

वाळूज महानगर : बजाजनगरातून २० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने पोलीस ठाण्यात दिली आहे. शुभांगी किरण अलमलकर (२० रा.बजाजनगर) ही सोमवारी (दि.५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिचा पती किरण अलमलकर याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.

फोटो क्रमांक- शुभांगी अलमलकर

---------------------

Web Title: Filed a case against a couple who beat up a worker