माजी महापौरांवर गुन्हा दाखल करा : भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:41+5:302021-05-07T04:04:41+5:30
औरंगाबाद : शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ...

माजी महापौरांवर गुन्हा दाखल करा : भाजपची मागणी
औरंगाबाद : शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ४ मे रोजी बीड येथे आंदोलन केले. त्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडले. मग औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या माजी महापौरांनी वाढदिवस साजरा केला. कोरोना महामारीत प्रशासनाने लावलेल्या सर्वच नियमांचा फज्जा उडवला. त्यावर प्रशासन गप्प का आहे. सत्तेचा हा गैरवापर असल्याचा आरोप केणेकर यांनी केला आहे.
माजी महापौर घोडेले यांनी सांगितले की, कळत-नकळत कार्यकर्ते आले. त्यामुळे त्यांचे स्वागत स्वीकारावे लागले. मी वाढदिवस साजरा करणार नाही, कुणी शुभेच्छा देण्यास येऊ नये, असे आवाहन केले होते. तरी काहीजणांनी रस्त्यावर अडवून स्वागत केले. कोरोनाचे नियम तोडून लोकांना त्रास देण्याची भूमिका त्यांची असेल, आमची नाही.